भाजपच्या प्रवक्त्या 'धनुष्यबाणा'वर लढणार, शिंदेंनी मुंबईतील जागा दिली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जागांची संख्या 80 पर्यंत पोहोचली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जागांची संख्या 80 पर्यंत पोहोचली आहे, यातल्या दोन जागा शिवसेनेने मित्रपक्षांना दिल्या आहेत. कोल्हापुरातल्या दोन जागा शिवसेनेने मित्रपक्षांना सोडल्या आहेत. विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला हातकणंगलेची तर राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या राजश्री शाहू विकास आघाडीला शिरोळची जागा देण्यात आली आहे. तर तिकडे भाजपनेही जनसुराज्य पक्षाला कोल्हापूरच्या शाहूवाडीची जागा सोडली आहे.
शायना एनसींना उमेदवारी
शिवसेनेच्या तिसऱ्या यादीमध्ये मुंबईतून भाजप नेत्या शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी शायना एनसी वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात लढण्यासाठी इच्छुक होत्या, पण शिवसेनेकडून या जागेवर मिलिंद देवरा यांना तिकीट देण्यात आलं. यानंतर आता शायना एनसी मुंबादेवी मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.
महायुतीच्या 9 जागा शिल्लक
शिवसेनेने 15 जणांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता त्यांच्या उमेदवारांची संख्या 80 झाली आहे तर भाजपने आतापर्यंत 146 जणांची उमेदवारी जाहीर केली असून 4 जागा त्यांनी मित्रपक्षांना सोडल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 49 जागांवर उमेदवार दिले आहेत, त्यामुळे महायुतीचे आता 279 उमेदवार जाहीर झाले असून आता आणखी 9 उमेदवार घोषित होणं शिल्लक आहे. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच मंगळवार 29 ऑक्टोबर आहे.
advertisement
शिवसेनेच्या यादीत कुणाला संधी?
सिंदखेडराजा- शशिकांत खेडकर
घनसावंगी- हिकमत उढाण
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एन सी
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर-भाऊसाहेब कांबळे
नेवासा-विठ्ठलराव लंघे पाटील
धाराशिव-अजित पिंगळे
करमाळा-दिग्विजय पाटील
बार्शी-राजेंद्र राऊत
गुहागर-राजेश बेंडल
हातकणंगलेज-अशोकराव माने
शिरोळ-राजेंद्र यड्रावकर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 28, 2024 10:51 PM IST









