'3 हजार देतो', 200 मतदारांना 3 तास ठेवलं डांबून, महाराष्ट्रात खळबळजनक प्रकार

Last Updated:

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथं 200 हून अधिक मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं.

News18
News18
नांदेड: आज राज्यभरात विविध ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथं २०० हून अधिक मतदारांना डांबून ठेवण्यात आलं होतं. संबंधित सर्व मतदारांना पैशांचं आमिष दाखवून एका मंगल कार्यालयात बोलवून घेतलं होतं. पण त्यांना पैसे न देता थेट डांबून ठेवण्यात आलं.
डांबून ठेवणारे पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. संबंधित सर्वांनी आज सकाळपासून अन्न पाण्याशिवाय मतदारांना डांबून ठेवलं होतं. मात्र या घटनेची माहिती काही पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांना मिळाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. काही पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवार यांचा फोटो असलेल्या कारमधून पळ काढला आहे.
advertisement
या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मतदान सुरू असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी धर्माबादमधील मतदारांना पैशांचं आमिष दाखवलं. प्रत्येक मतासाठी १ हजार रुपये देणार असल्याचं सांगून सर्वांना एका मंगल कार्यालयात बोलावण्यात आलं. काही वेळ त्यांना बसवून ठेवल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केला आणि प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. यावेळी २०० हून अधिक मतदार मंगल कार्यालयात होते.
advertisement
सर्वजण बराच वेळ पैसे मिळण्याची वाट पाहत होते. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर हा सगळा प्रकार काही मतदारांच्या लक्षात आला. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गेटवरून उड्या मारून पळ काढला. तर काहीजण कारसह पळून गेले. हे सर्वजण भाजप आमदार राजेश पवारांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मतदारांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'3 हजार देतो', 200 मतदारांना 3 तास ठेवलं डांबून, महाराष्ट्रात खळबळजनक प्रकार
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement