शुभमन गिलची हकालपट्टी, ईशान किशनची सरप्राईज एन्ट्री! टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर

Last Updated:

Team India squads for ICC Men T20 World Cup 2026 : चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल.

Team India squads for ICC Men T20 World Cup 2026
Team India squads for ICC Men T20 World Cup 2026
BCCI announced Team India squads : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 मध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया भारतच होणारा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहे. अशातच आज मुंबईच्या बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये वर्ल्ड कपचा स्कॉड जाहीर करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये सिलेक्शन कमिटीचे सदस्य, चीफ सिलेक्टर अजित आगरकर, हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव उपस्थित होते. अशातच आता बीसीसीआयने 15 खेळाडूंचा स्कॉड जाहीर केला आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड सिरीजसाठी एकच टीम आहे.

टीम इंडियाची ताकद काय? 

नेहमीप्रमाणे अभिषेक शर्मावर आक्रमक सुरूवात करण्याचं आवाहन असेल. अभिषेकच्या अटॅकमुळे टीम इंडियाला एक लय मिळू शकते. तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर स्पिनर्सला खेळू काढण्याचं काम असेल. शेवटी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना फिनिशिंगचा रोल कायम ठेवावा लागेल. तर स्पिनर डिपार्टमेंटमध्ये वरूण चक्रवर्ती मुख्य भूमिका निभावणार आहे. तर अर्शदीप आणि बुमराह विरोधी संघाचा खेळ खल्लास करतील.
advertisement

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया - 

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकु सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरून चक्रवती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन.
advertisement

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या गट-ए मध्ये कोण?

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या गटात तगडे स्पर्धक नाहीत. संघाला गट-ए मध्ये पाकिस्तान, यूएसए, नामिबिया आणि नेदरलँड्ससोबत ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा अलीकडील विक्रमही मजबूत राहिला आहे. भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा हरवले आहे आणि याशिवाय एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्यांना पराभूत केले होते. त्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट जवळजवळ निश्चित आहे.
advertisement
दरम्यान, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, जिथे टीम इंडिया आपल्या पहिल्या मॅचमध्ये अमेरिकेचा (USA) सामना करेल. त्यानंतर, 12 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ दिल्लीत नामिबियाविरुद्ध मैदानात उतरेल. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित आणि हाय-व्होल्टेज मॅच, म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना टीम इंडिया 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शुभमन गिलची हकालपट्टी, ईशान किशनची सरप्राईज एन्ट्री! टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement