मुंबईच्या निकालात बिहारचा दबदबा, एकाच तालुक्यातील सहा जण नगरसेवक झाले, विजयी गुलाल उधळला

Last Updated:

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर या एकाच तालुक्यातील सहा जणांनी मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवला.

मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा बिहारच्या मिथिलांचली विशेष चर्चा झाली. कारण मुंबईच्या राजकारणात बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर या एकाच तालुक्यातील सहा जणांनी आपली ताकद सिद्ध करत उत्तर भारतीय मतदारांचा मुंबईत असलेला प्रभाव अधोरेखित केला.
विशेषतः वार्ड क्रमांक 23 (कांदिवली पूर्व) येथून भाजपचे उमेदवार शिवकुमार झा यांनी दमदार विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. उत्तर भारतीय समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख आणखी मजबूत झाली आहे. मूळचे अंधराठाढी प्रखंडातील गंगद्वार गावचे रहिवासी असलेले शिवकुमार झा यांच्या सलग तिसऱ्या विजयाची चर्चा होत आहे.
advertisement

गावच्या मातीशी नातं, मुंबईत नेतृत्व

लहानशा गावातून मायानगरीत येत राजकारणात मोठं स्थान मिळवणारे शिवकुमार झा आज उत्तर भारतीय समाजासाठी प्रेरणादायी बनले आहेत. स्थानिकांच्या मते, ते आजही आपल्या मदना गावाशी घट्ट जोडलेले असून, सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांसाठी गावाला जाणे ते कधीच टाळत नाहीत. हीच आपुलकी आणि माणुसकी असल्याने मुंबईकरांनी त्यांना नेता बनवले.

मुंबईच्या निवडणुकीत झंझारपूरच्या ‘टोळी’चा दबदबा

advertisement
झंझारपूरच्या महिनाथपूरचे मूळ रहिवासी विनोद मिश्रा (वॉर्ड 43, मलाड) यांनी भाजपकडून मोठ्या फरकाने विजय मिळवला. अंधराठाढीचे राजेश झा यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे गोरेगाव (वॉर्ड क्रमांक 163) मधून विजय निश्चित केला. कांदिवलीतील वॉर्ड क्रमांक 160 आणि वॉर्ड क्रमांक 161 मध्ये लखनौरचे संतोष कुमार मंडल आणि उमेश राय यांनी भाजपकडून विजय मिळवला. तर झंझारपूरचे धीरेंद्र मिश्रा यांनी कुर्ला-चांदीवली (वार्ड क्रमांक 174) मध्ये अटीतटीच्या लढतीनंतर विजय खेचून आणला.
advertisement
राजकीय विश्लेषकांच्या मते, कांदिवली, मलाड, गोरेगाव आणि कुर्ला या भागांत उत्तर भारतीय मतदार निर्णायक ठरले. शिवकुमार झा यांची हॅट्ट्रिक आणि इतर मिथिलांचलच्या उमेदवारांची कामगिरी पाहता, मुंबईच्या विकासात मिथिलांचलचा सहभाग आणि प्रभाव दोन्ही वाढत असल्याचं स्पष्ट दिसते.

शिवकुमार झा यांचा 5 हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय

कांदिवली पूर्वच्या वार्ड 23 मधून शिवकुमार झा यांनी सुमारे 5 हजार 400 मतांच्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. २०१७ मध्ये त्यांनी 2 हजार600 मतांनी विजय मिळवला होता. यंदा ते दुप्पट मतांनी जिंकले.
advertisement

कोणकोण जिंकले?

विनोद मिश्रा (वार्ड 43, मलाड) – सुमारे 3,800 मतांनी विजय
राजेश झा (वार्ड 163, गोरेगाव) – 2,200 मतांनी विजय
संतोष कुमार मंडल (वार्ड 160) – 2,500 मतांची आघाडी
उमेश राय (वार्ड 161) – 1,900 मतांनी विजय
धीरेंद्र मिश्रा (वार्ड 174, कुर्ला) – सुमारे 1,100 मतांनी विजय
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईच्या निकालात बिहारचा दबदबा, एकाच तालुक्यातील सहा जण नगरसेवक झाले, विजयी गुलाल उधळला
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement