'हा तुझा पराभव नाही...' डॅडींच्या लेकीला भायखळ्यात धक्का, योगिता गवळीसाठी अभिनेता पतीची इमोशनल पोस्ट

Last Updated:
डॅडींची मुलगी योगिता गवळी हिचा BMC निवडणुकीच पराभव झाला. पत्नीच्या पराभवानंतर अभिनेता पतीनं तिच्यासाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
1/9
अखिल भारतीय सेना पक्षाच्या उमेदवार योगिता गवळी यांना बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. भायखळा परिसरातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या उमेदवारासमोर त्या टिकू शकल्या नाहीत.

advertisement
2/9
योगिता गवळी या माजी आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारणी बनलेले अरुण गवळी यांची कन्या आहेत. या निवडणुकीत डॅडींच्या दोन्ही मुलींना पराभव पत्करावा लागला. योगिता गवळीच्या निवडणुकीचील पराभवानंतर योगिता यांचा नवरा अभिनेता अक्षय वाघमारे याने बायकोसाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

3/9
अक्षयने पोस्टमध्ये लिहिलंय,
अक्षयने पोस्टमध्ये लिहिलंय, "​प्रिय बायको, सर्वात आधी तुझे मनःपूर्वक आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे.  Pregnancy आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई... ही सर्व जबाबदारी खांद्यावर असताना तू ज्या धैर्याने ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे."
advertisement
4/9
 "सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे. कोणाही पेक्षा वैयक्तिकरित्या तुला सर्वाधिक 6,300 मतं मिळाली आहेत. तुझ्या आसपासही कोणी नाही, हे तू सिद्ध केलंस."
"सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे. कोणाही पेक्षा वैयक्तिकरित्या तुला सर्वाधिक 6,300 मतं मिळाली आहेत. तुझ्या आसपासही कोणी नाही, हे तू सिद्ध केलंस."
advertisement
5/9
अक्षयने सासरे डॅडींविषयी बोलताना म्हटलं,
अक्षयने सासरे डॅडींविषयी बोलताना म्हटलं, "​डॅडींनी, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कष्टांची ही पावती आहे. भायखळ्याच्या जनतेने तुला जे प्रेम दिलंय, ते पाहून हे स्पष्ट होतंय की लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. त्यांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या 'कामावर' आणि 'विकासावर' विश्वास दाखवला आहे."
advertisement
6/9
योगिता गवळी निवडणुकींच्या काही दिवस आधी आई झाल्या. घरी तान्हबाळ असूनही त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अक्षयनं याविषयी म्हटलं,
योगिता गवळी निवडणुकींच्या काही दिवस आधी आई झाल्या. घरी तान्हबाळ असूनही त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अक्षयनं याविषयी म्हटलं, "​गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मोठी मुलगी आणि आत्ताच जन्मलेलं आपलं बाळ..."
advertisement
7/9
 "या दोघींना सोडून तू रोज 12-12 तास काम करायचीस. दिवसातून एकदाही त्यांना भेटता येत नव्हतं, तरीही फोनवरून तुझी त्यांच्याबद्दलची काळजी आणि तुझ्यातली ती हळवी 'आई' मी सतत अनुभवत होतो. तुला शारीरिक वेदना होत होत्या, पण तू कधीच तक्रार केली नाहीस की कोणावर चिडली नाहीस. तुझा तो शांत आणि संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे."

8/9
अक्षयने पोस्टच्या शेवटी लिहिलंय,
अक्षयने पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "​एक गोष्ट लक्षात ठेव, जर सर्व पक्ष स्वतंत्र लढले असते, तर मतांच्या बाबतीत तुझ्या जवळपास ही कोणी नव्हत.लोकांनी तुझ्यावर आणि डॅडींच्या कर्तृत्वावर मोहोर उमटवली आहे."
advertisement
9/9
 "​हा तुझा पराभव नक्कीच नाही, तर ही तुझी राजकारणातली एक 'धमाकेदार एंट्री' आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो, बाळा. आता अधिक जिद्दीने कामाला लागूया. ​Love you always"
"​हा तुझा पराभव नक्कीच नाही, तर ही तुझी राजकारणातली एक 'धमाकेदार एंट्री' आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो, बाळा. आता अधिक जिद्दीने कामाला लागूया. ​Love you always"
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement