SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी 391 जागा भरणार, दहावी उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची संधी

Last Updated:

BSF Constable GD Recruitment 2025: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे, सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरभरती सुरू आहे. कॉन्स्टेबल पदासाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 391 जागांवर ही नोकरभरती केली जाणार आहे.

SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी 391 जागा भरणार, दहावी उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची संधी
SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी 391 जागा भरणार, दहावी उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची संधी
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे, सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरभरती सुरू आहे. कॉन्स्टेबल पदासाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 391 जागांवर ही नोकरभरती केली जाणार आहे. 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली ऑनलाईन भरती प्रक्रियेचा अखेरचा दिवस 04 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. सीमा सुरक्षा दलामधील कॉन्स्टेबल पदासाठीची भरती क्रीडा कोट्याअंतर्गत आयोजित केली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
सीमा सुरक्षा दलातील भरतीमध्ये कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी 391 जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल तीननुसार दरमहा 21,700 ते 69,100 रुपये इतके वेतन मिळणार आहे, जे 7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC) असेल. कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदासाठी अर्जदार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, अर्जदाराने गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असणे किंवा पदक जिंकलेले असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
BSF Recruitment 2025 Age Limit: वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवार (UR): 18 ते 23 वर्षे
ओबीसी उमेदवार (OBC): 18 ते 26 वर्षे
एससी / एसटी उमेदवार (SC/ST): 18 ते 28 वर्षे
BSF Recruitment 2025 Application Fees: अर्ज शुल्क
UR, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 159 रूपये आहे. अनुसूचित जाती- जमाती, महिला, विभागीय आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. मात्र, CSC (Common Service Centre) द्वारे अर्ज केल्यास 50 + कर (59) सेवा शुल्क आकारले जाईल. कॉन्स्टेबल (GD) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21,700 रुपये ते 69,100 रूपये दरम्यान वेतन दिले जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी 391 जागा भरणार, दहावी उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची संधी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement