विमानतळावर ‘हाय सिक्युरिटी झोन’ मोठा अनर्थ टळला, विमानाच्या जवळ पेटली एअर इंडियाची बस; जीवघेणा प्रसंगाचा Video

Last Updated:

Bus Caught Fire: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल ३ जवळ एअर इंडियाची बस ज्वाळांनी वेढली, काही क्षणांत संपूर्ण परिसर धुराने भरून गेला. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते, अन्यथा मोठा अपघात घडला असता.

News18
News18
नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एक बस आगीत भस्मसात झाली. ही घटना दुपारी सुमारे बाराच्या सुमारास टर्मिनल 3 वर घडली. आग लागल्याच्या वेळी बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. विमानतळावरील अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या अपघातात रूपांतर होण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवले.
advertisement
दिल्ली विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, आग लागलेली बस एका ग्राउंड हँडलिंग कंपनीच्या वापरात होती. अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यात संपूर्ण बस ज्वाळांनी वेढलेली दिसते. जवळच विमानतळ कर्मचाऱ्यांना परिसराची सुरक्षा करताना पाहिले गेले. विशेष म्हणजे आग लागलेली बस एका विमानाच्या अगदी जवळ उभी होती. त्यामुळे काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
दरम्यान दिल्ली फायर सर्व्हिसेसने सांगितले की- त्यांना या घटनेबाबत कोणताही कॉल प्राप्त झाला नव्हता, कारण विमानतळ प्रशासनाने स्वतःच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही, तसेच विमानतळावरील कामकाजावरही कोणताही परिणाम झाला नाही. आग विझल्यानंतर बसला तात्काळ त्या ठिकाणाहून हटवण्यात आले.
advertisement
advertisement
दरम्यान आणखी एक वेगळी आग लागण्याची घटना विजयवाड्यातील गन्नावरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी घडली. या आगीत सीमाशुल्क विभागाच्या कक्षातील उपकरणे आणि सामान जळून खाक झाले.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन खोलीत लागली, जिथून अचानक ज्वाळा उठल्या. आग सुरुवातीला इमिग्रेशन विभागाच्या भागात लागली होती आणि त्यानंतर ती सीमाशुल्क कार्यालयाच्या इतर भागात पसरली.
advertisement
या आगीत इमिग्रेशन रूममधील सॉफ्टवेअर उपकरणे, स्प्लिट एअर कंडिशनर आणि सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या काही बॅगा पूर्णपणे जळून गेल्या. विमानतळावरील अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेळेत आग नियंत्रणात आणत मोठा अपघात टाळला.
view comments
मराठी बातम्या/देश/
विमानतळावर ‘हाय सिक्युरिटी झोन’ मोठा अनर्थ टळला, विमानाच्या जवळ पेटली एअर इंडियाची बस; जीवघेणा प्रसंगाचा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement