Buldhana: डोळ्यात पाणी अन् हात जोडले, साहेब मला न्याय द्या! बाळ गमावलेल्या बापाची कहाणी

Last Updated:

यशवंत संजय भोजने, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा, भाजीपाल्यावर किरकोळ वाद झाला. त्यामुळे भांडण झाले. तिथे विजय गावंडे, गौरव गावंडे आणि त्याची पत्नी आणि बहीण यांनी मिळून पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलडाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणात गंभीर घटना घडली आहे. मारहाण झालेल्या गरोदर मातेच्या पोटातील दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. शेगावतीलच विजय गावंडे, त्यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी पीडित कुटुंबाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणात तक्रार शेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या पीडित कुटुंबाला तब्बल तीन तास पोलिसांनी बसवून ठेवल्याचा आरोप ही केला जात आहे. त्यामुळे उपचार घेण्यास उशीर झाल्याने या महिलेच्या पोटातील बाळ दगावले असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कुटुंबीयांनी केला.
पीडित संजय भोजने काय म्हणाले?
यशवंत संजय भोजने, राहणार शेगाव, जिल्हा बुलढाणा, भाजीपाल्यावर किरकोळ वाद झाला. त्यामुळे भांडण झाले. तिथे विजय गावंडे, गौरव गावंडे आणि त्याची पत्नी आणि बहीण यांनी मिळून पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. काही लाथा तिच्या पोटावरही मारल्या, तिचे कपडेही फाडले. हे सगळं करुन ते निघून गेले, आम्ही पोलिसांकडे शेगावला तक्रार द्यायला गेलो. तिथे त्यांनी काहीच कारवाई केली नाही. ताटकळत बसवून ठेवलं.
advertisement
बाळ दगावल्याचं दु:ख
पोलिसांना सांगितलं पत्नीला खूप ब्लिडिंग झालं आहे. डॉक्टरांनी दुसऱ्या ठिकाणी रेफर केलं आहे तिथं जायचं आहे. मात्र तरीही पोलिसांनी 1-2 वाजेपर्यंत बसवून ठेवलं. अकोल्याला लवकर उपचारासाठी हलवायचं होतं, मात्र त्यांनी आमच्यासोबत कॉन्स्टेबलही दिला नाही कारवाईही केली नाही. अकोल्याला तिची ट्रिटमेंट तातडीनं न झाल्याने पत्नीच्या पोटातील बाळ गमावलं आहे. पत्नी दोन महिन्यांची गर्भवती होती. मात्र खूप जास्त ब्लिडिंग झालं त्यामुळे बाळ दगावल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाने माझी अडचण समजून तातडीनं कारवाई करावी आणि मदत करावी अशी मागणी केली आहे.
advertisement
हात जोडून प्रशासनाला विनंती
पीडित संजय भोजने यांना ही सगळी परिस्थिती सांगताना अक्षरश: रडू कोसळलं. बाळ दगावल्याचं दु:ख आणि न्याय मिळवून द्यावा अशी प्रशासनाकडे त्यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझं बाळ दगावलंय मला न्याय द्या असं ते हात जोडून म्हणत राहिले. मात्र पोलीस आणि रुग्णालयात मात्र सगळ्यासाठी उशीर करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी मग कुणाकडे बघायचं हा प्रश्नही या घटनेनंतर उपस्थित होत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. तर बाळ गमावल्याने भोजने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात आता मारहाण करणारया आरोपींविरुद्ध तसेच दप्तर दिरंगाइ करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Buldhana: डोळ्यात पाणी अन् हात जोडले, साहेब मला न्याय द्या! बाळ गमावलेल्या बापाची कहाणी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement