VIDEO : बुलडाण्यात 'आलिया अजब वरात'! ना डीजे, ना बँड-बाजा तरी वरात पाहूनच नाचाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
डीजे, बँड-बाजाशिवाय निघालेल्या लग्नाच्या या अनोख्या वरातीची चर्चा सर्वत्र होते आहे. या वरातीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी/बुलडाणा : लग्न म्हटलं की बँड, बाजा, डीजे या गोष्टी आल्याच. याशिवाय लग्न पूर्णच होत नाही असं अनेकांना वाटतं. पण बँड-बाजा-बारात या गोष्टीला फाटा देत एक अनोखी वरात निघाली आहे ती बुलडाण्यात. या वरातीची चर्चा सर्वत्र होते आहे. चक्क टाळ-मृदुंगाच्या गजरात ही वरात निघाली आहे.
खामगाव तालुक्यातील राहुड येथील नवरा आणि नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील नवरी यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचं आकर्षण ठरलं ते त्यांची वरात. एरवी बँड-बाजासह वरात घेऊन नवरदेव नवरीला घ्यायला तिच्या दारात येतो. इथं मात्र टाळ-मृदुंगाच्या गजरात नवरदेव नवरीला घ्यायला आला.
बुलडाण्यात टाळ-मृदुंगाच्या गजरात लग्नाची वरात pic.twitter.com/EHQVMZ75BF
— News18Lokmat (@News18lokmat) April 4, 2024
advertisement
लग्नाच्या या वरातीत शेकडो वारकरी सहभागी झाले होते. वरातीत वारकऱ्यांसह नवरदेवानंही टाळ-मृदुंगाच्या तालावर ताल धरल्याचं दिसलं आहे.
टाळ - मृदुंगाच्या गजरात नवरदेवाने आपली मिरवणूक काढत लग्न उरकले आणि त्यावर विनाकारण होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळला. या दाम्पत्याने ज्या पद्धतीने हजारो रुपयांची उधळपट्टी रोखली ते कौतुकास्पद आहे.
advertisement
हेडफोन घालून सायलेंट वरात
याआधी सायलेंट वरातीचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लग्नाच्या वरातीत डीजे होता. पण तो मोठमोठ्याने वाजवला जात नव्हता. तर प्रत्येक वऱ्हाड्याला हेडफोन देण्यात आले होते. हेडफोन घालून ते लग्नाच्या वरातीत नाचत आहेत.
advertisement
@shefooodie इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. तुम्ही अशी कोणती लग्नाची अनोखी वरात पाहिली होती का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
April 04, 2024 12:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
VIDEO : बुलडाण्यात 'आलिया अजब वरात'! ना डीजे, ना बँड-बाजा तरी वरात पाहूनच नाचाल


