Vidhanparishad Election : 'मला मिळणारी विधानपरिषद' रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टींवर गंभीर आरोप; म्हणाले लाल बिल्ला
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Vidhanparishad Election : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बुलढाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. बुलढाणा येथे आज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लक्ष्य केलं. मला मिळणारी विधानपरिषदची आमदारकी राजू शेट्टी यांनी घेतली, असं बोलत तुपकरांनी राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले.
काय म्हणाले तुपकर?
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना विधान परिषदेचे आमदारकी मिळत होती. इतकंच नाही तर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जिरेंद्र आव्हाड यांच्यासमोर मला विधान परिषदची आमदारकी देणार असल्याचे ठरलं होतं. मात्र, ती आमदारकी राजू शेट्टी यांनी घेतली असा आरोप रविकांत तुपकर यांनी लावला. माझ्यासाठी राजू शेट्टी यांनी कुठलीही समिती नेमावी. माझं मत मी 10 पानाच पाठवलेले आहे, असं बोलत लाल बिल्ला ही कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, असा घणाघात तुपकर यांनी केला.
advertisement
संघटना वाढविण्यासाठी अनेकांनी आपली घरे उध्वस्त केली. संघटनेवर सर्वांचा सारखा अधिकार आहे, असं बोलत राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. ज्यांचं चळवळीसाठी काहीच योगदान नाही ते संघटनेच्या मुख्य समितीमध्ये आहेत. त्यांच्यासमोर मी का जावं? असं प्रश्न उपस्थित करत तुपकरांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. त्यामुळे शेट्टी आणि तुपकर वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
advertisement
काय म्हणाले तुपकर?
view commentsस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींशी काडीमोड घेतल्यानंतर आज तुपकर यांनी बुलढाण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी बोलतना प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याशी आपली गुप्त भेट झाली असल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला. “बच्चू कडू राज्यात महायुती आणि महाविकास आघाडील टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करत आहेत. आपण त्यांना साथ देणार आहोत. याच मुद्द्यावर माझ्या संपर्कात राज्यातील काही बडे नेते, आजी- माजी आमदार आहेत.” असा दावा तुपकर यांनी केली आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
July 06, 2024 11:23 PM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
Vidhanparishad Election : 'मला मिळणारी विधानपरिषद' रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टींवर गंभीर आरोप; म्हणाले लाल बिल्ला


