VIDEO : दोस्ताक् काळजी! मॉर्निंग वॉकला आला नाही म्हणून मित्र पोहचले बँड बाजा घेऊन
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
स्वत:ला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेक लोक दररोज व्यायाम करतात. बरेच लोक ओळखीच्या ग्रुपसोबत जाऊन व्यायम, जीम, मॉर्निंग वॉक करत असतात जेणेकरुन अधिक उत्साह आणि मोटिवेशन राहिल.
बुलढाणा, 03 नोव्हेबर : स्वत:ला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी अनेक लोक दररोज व्यायाम करतात. बरेच लोक ओळखीच्या ग्रुपसोबत जाऊन व्यायम, जीम, मॉर्निंग वॉक करत असतात जेणेकरुन अधिक उत्साह आणि मोटिवेशन राहिल. याविषयी लोकांच्या वेगवेगळ्या घटना कायमच समोर येत असतात. सध्या चर्चेत आलेली घटना वाचून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. 3 दिवसांपासून मॉर्निंग वॉकला न आल्यानं मित्र बँड बाजा घेऊन पोहचले मित्राच्या घरी. हे मजेशीर प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया.
बुलढाणा जिल्ह्यात एका मित्राने मॉर्निंग वॉकला तीन दिवसापासून दांडी मारल्यानं मित्रांनी एक अफलातून शक्कल लढवली आहे. थेट बँड बाजा घेऊन मॉर्निंग वॉकला न येणाऱ्या मित्राच्या घरी ते पोहोचले. बँड बाजा वाजवत या मित्राला पहाटे पहाटे जागं करून मॉर्निंग वॉकला येण्यासाठी आवाहन त्यांनी केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील काही मित्र दररोज मॉर्निंग वॉक साठी जात होते. मात्र त्यांच्यापैकी एक मित्र तीन दिवसापासून मॉर्निंग वॉकला दांडी मारत असल्यानं या मित्रांनी शक्कल लढवली. अगदी पहाटे या मित्राच्या घरी बँड बाजा वाजवत त्याला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न या मित्रांनी केला आहे. आणि मॉर्निंग वॉक शरीर स्वास्थ्यासाठी किती महत्त्वाचं असतं याचं महत्त्व पटवून देत या मित्राला पुन्हा एकदा मॉर्निंग वाकला येण्याचं आवाहन या मित्रांकडून करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
Buldhana : 3 दिवसांपासून मॉर्निंग वॉकला न आल्यानं मित्र बँड बाजा घेऊन पोहचले मित्राच्या घरी#buldhana #fitness #morningwalk #news18marathi pic.twitter.com/gpkl2m82qF
— News18Lokmat (@News18lokmat) November 3, 2023
दरम्यान, हे प्रकरण सध्या चर्चेत आलं असून सोशल मीडियावरही वाऱ्यासारखं पसरत आहे. मित्रांची अनोखी शक्कल अनेकांना आवडली. काहींनी मित्र असावे तर असे, असं म्हटलं. मित्राला मोटीवेट करण्यासाठी फीटनेसचं महत्त्व पटवून देण्याची ही आयडिया चांगली चर्चेचा विषय ठरतेय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2023 9:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
VIDEO : दोस्ताक् काळजी! मॉर्निंग वॉकला आला नाही म्हणून मित्र पोहचले बँड बाजा घेऊन









