Shetkari Sanghatana : 'संघटनेतून हकालपट्टी हा माझ्यासाठी..' कारवाईनंतर तुपकरांनी व्यक्त केली मनातील खदखद
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभीमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई केली आहे. यानंतर तुपकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
बुलढाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात राजकीय आखाडा पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्यावर कारवाई करत आता पक्षाशी त्यांचा संबंध राहिला नसल्याचं स्पष्ट केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. तुपकर यांना अनेकदा संधी दिल्यानंतरही शिस्तपालन समितीसमोर ते हजर राहिले नाहीत. त्यांनी शेतकरी संघटनेत खूप काम केलं असल्यानं आम्ही त्यांच्याबाबत हकालपट्टी हा शब्द वापरणार नसल्याचंही जालिंदर पाटील म्हणाले. या कारवाईनंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रविकांत तुपकर?
पक्ष विरोधी कारवाया, पक्ष श्रेष्ठी विरोधात आरोप करणाऱ्या रविकांत तुपकरांची पक्ष संघटनेकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांतकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर रविकांत तुपकर माध्यमांसमोर आले आहे आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेसाठी 20-22 वर्षे काम केल्यानंतर त्याचं फळ असं मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं म्हणत, कोल्हापूरमध्ये सीमित असणारी संघटना राज्यभर वाढवण्यासाठी काम केलं असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय. त्यामुळे आता 24 तारखेनंतर आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याच रविकांत तुपकर यांनी सांगितलंय. त्यामुळे आता 24 तारखेच्या बैठकीनंतर रविकांत तुपकर हे नवीन संघटना काढतात किंवा कुठल्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
advertisement
तुपकरांनी बोलावली होती संघटनेची बैठक
रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या बैठकीशी संघटनेचा कोणताही संबंध नाही असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. जालिंदर पाटील म्हमाले की, तुपकर यांना अनेकदा संधी देऊनही ते आमच्या शिस्तपालन समितीसमोर हजर झालेले नाही. उलट ते शेट्टी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या तीन ऊस परिषदेलाही ते गैरहजर राहिले आहेत.
advertisement
बुलढाणा लोकसभासुद्धा तुपकर यांनी संघटनेच्या एबी फॉर्म वर लढण्याऐवजी अपक्ष लढवली. याचा अर्थ त्यांना स्वाभिमानी संघटनेत कोणताही रस दिसत नाही. अलिकडे तर तुपकर हे स्वाभिमानी ही संघटना माझ्याच नावावर असल्याचा ते दावा करू लागलेत. या संभ्रमावर आम्हाला उत्तर हवंय कारण तुम्ही दिलेल्या राजिनाम्याचं पञ आमच्याकडे आहे मग तरीही संघटनेवर तुम्ही दावा कसा काय करता? असा प्रश्न जालिंदर पाटील यांनी विचारला.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
July 22, 2024 10:26 PM IST
मराठी बातम्या/बुलढाणा/
Shetkari Sanghatana : 'संघटनेतून हकालपट्टी हा माझ्यासाठी..' कारवाईनंतर तुपकरांनी व्यक्त केली मनातील खदखद


