मकावर औषध टाकताना 5 जणांना विषबाधा; वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, बुलढाण्यातील धक्कादायक घटना
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मकावर औषधी टाकताना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. या घटनेच 5 जणांना विषबाधा झाली असून यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
राहुल खंडारे, बुलढाणा : बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मकावर औषधी टाकताना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. या घटनेच 5 जणांना विषबाधा झाली असून यामध्ये एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मकाच्या कंसात कीड लागू नये म्हणून अनेक शेतकरी त्यात प्युरी टाकत असतात. धामणगाव बढे येथील आपल्या शेतात मकाच्या कंसात प्युरी टाकत असताना विषबाधा होऊन एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. 3 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
advertisement
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या ग्राम धामणगाव बढे येथील दामोदर नारायण जाधव वय 60 वर्ष व त्यांच्या परिवारातील इतर सदस्य आपल्या शेतात गेले होते. यावेळी ते शेतातील मकाच्या कंसात कीड होऊ नये म्हणून प्युरी टाकत होते. थोड्या वेळातच काही जणांना मळमळ व उलट्या होऊ लागल्या. तात्काळ नातेवाईकांनी त्यांना धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेलं.
advertisement
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्यावर दामोदर नारायण जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं. तर मोहन देवानंद जाधव वय 12 वर्ष, बेबीबाई शिवाजी जाधव वय 57 वर्ष आणि सुभद्राबाई लक्ष्मण जाधव वय 60 वर्ष यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 19, 2024 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
मकावर औषध टाकताना 5 जणांना विषबाधा; वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, बुलढाण्यातील धक्कादायक घटना


