Buldhana Crime News : मुख्याध्यापिकेचं चिमुकल्यासोबत धक्कादायक कृत्य, चड्डी काढली अन्..; बुलढाण्यातून हादरवणारी घटना समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
वडिलांसोबत झालेल्या वादानंतर मुख्याध्यापिकेनं चिमुकल्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा, राहुल खंडारे, प्रतिनिधी : बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने आठ वर्षांच्या चिमुकल्यासोबत गैरवर्तवणूक केली आहे. या प्रकरणात विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली. प्राप्त तक्रारीवरून संबंधित शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती. काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांचा आणि मुख्याध्यापिकेचा वाद झाला होता.
दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पीडीत विद्यार्थ्याला दुपारी वर्गखोलीत बोलावले. "माझी कंप्लेंट वडिलांकडे करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते" असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची चड्डी काढून विद्यार्थ्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे. यामुळे घाबरलेला विद्यार्थी पळत घराकडे निघाला. पळत असताना तो शाळेत पडला. त्याच्या पायाला मार लागला आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप करत संबंधित मुख्याध्यपीकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Buldana,Buldana,Maharashtra
First Published :
March 23, 2024 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Crime News : मुख्याध्यापिकेचं चिमुकल्यासोबत धक्कादायक कृत्य, चड्डी काढली अन्..; बुलढाण्यातून हादरवणारी घटना समोर


