यापेक्षा स्वस्त कुठेच नाही! 200 रुपयांपासून बच्चे कंपनीसाठी कपडे; हा घ्या दुकानाचा पत्ता!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
कल्याणमधील मोहने मार्केटमध्ये गणेश कलेक्शन या शॉपमध्ये लहान मुलांच्या 1 महिन्यापासून ते 60 वर्षापर्यंतचे कपडे कमी भावात उपलब्ध आहेत. 200 रुपयांपासून सुरु झालेले कपड्यांचे भाव 4 हजार पर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहे.
दिवाळी म्हटले की सगळ्यात आधी कपडे फटाके अन्य वस्तूंची खरेदी लहान मुलांपासून केली जाते. कल्याणमधील मोहने मार्केटमध्ये गणेश कलेक्शन या शॉपमध्ये लहान मुलांच्या 1 महिन्यापासून ते 60 वर्षापर्यंतचे कपडे कमी भावात उपलब्ध आहेत. 200 रुपयांपासून सुरु झालेले कपड्यांचे भाव 4 हजार पर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहे.
गेल्या 30वर्षापासून हे शॉप कल्याणच्या नजीक असलेल्या अंबिवलीतील मोहन्यामध्ये आहे. सण उत्सव आले की, गणेश कलेक्शनमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे नवनवीन फॅन्सी कपडे तसेच पार्टी वेअर ड्रेसेस याठिकाणी कमी भावात उपलब्ध असतात. कल्याण, कर्जत, कसारा, टिटवाळासह आजूबाजूच्या शहरांमधून गिऱ्हाईक लहान मुलांच्या कपडे खरेदी साठी येत असतात. त्यामुळे या कपड्यांची वेगळीच ओळख या गणेश कलेक्शन ने केली आहे.
advertisement
दिवाळीमध्ये लहान मुलांचे कपडे हवे असलेले मिळालेच नाही अस कधी होतच नाही. एवढ्या आवडीनिवडी हे शॉप जपत असतो. त्यामुळे अनेकांची गर्दी या शॉपकडे असते. मुख्य म्हणजे लहान मुलांचे हट्ट पूर्ण करणार हे शॉप मोहन्यात ओळखले जाते. लहान मुलांचे कपडे विविध प्रकारांचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, जसे की आरामदायी कॉटनचे कपडे, पारंपरिक पोशाख आणि फॅन्सी ड्रेस. हे कपडे खरेदी करताना मुलांच्या आरामाचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
कपडे स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि दुकानांचे पर्याय उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला फंकी शर्ट, टी-शर्ट, जीन्स, पॅन्ट आणि पारंपरिक कपड्यांचे मोठे कलेक्शन मिळतात. कपड्यांचे प्रकार आणि उपलब्धतेनुसार पर्याय आरामदायी आणि फॅन्सी कपड मुलांना आरामदायक वाटतील अशा फॅन्सी आणि सुंदर कपड्यांसाठी अनेक दुकाने आहेत. परंतु मोहन्यात गेल्या 30 वर्षापासून गणेश कलेक्शन या दुकानाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे . दिवाळीत या शॉपने डिस्काउंट ऑफर 20 टक्के ठेवली आहे. तरी कमी भावात तुम्हाला हवे असलेले लहान मुलांचे कपडे या ठिकाणी आवर्जून खरेदी करू शकता.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 17, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
यापेक्षा स्वस्त कुठेच नाही! 200 रुपयांपासून बच्चे कंपनीसाठी कपडे; हा घ्या दुकानाचा पत्ता!