लव्ह, सेक्स अन् धोका; ट्रेनी PSI चे तरुणीसोबत भयानक कृत्य समोर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची ओळख प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकासोबत झाली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले आणि याचा फायदा घेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे.
छत्रपती संभाजीनगर: शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची ओळख प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकासोबत झाली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले आणि याचा फायदा घेत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि जबरदस्ती गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
अखेर मानसिक छळ असह्य झाल्यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पीएसआयसह त्याचे कुटुंबीयही गुन्ह्यात गोवले गेले आहेत. परभणी जिल्ह्यातील सायली (नाव बदलेले) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात राहते. याच काळात परभणीतीलच भागवत ज्ञानोबा मुलगीर या तरुणाशी तिची ओळख झाली. स्पर्धा परीक्षेच्या वर्गातून दोघांत जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
advertisement
फेब्रुवारी 2024 मध्ये भागवतने अर्पिताला अजबनगर कमानीजवळील एका कॅफेत बोलावून घेतले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी अर्पिता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दबाव टाकला आणि जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. यातून तिचा गर्भपात झाला. गर्भपातानंतर आरोपीने पीडितेकडून पूर्णतः दुरावा ठेवत तिला ब्लॉक केले.
advertisement
तरुणीने हा संपूर्ण प्रकार आरोपीच्या बहिणी आणि वडिलांना सांगितला असता, “तुला जे करायचं ते कर” अशी धमकीवजा प्रतिक्रिया मिळाली. शेवटी मानसिक त्रासाने थकलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर क्रांती चौक पोलिसांनी बलात्कार, धमकी, तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या वडिल आणि बहिणीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कॅफे परिसराचा पंचनामा केला. पंचनामा सुरू असताना पोलिसांनी माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचेपर्यंत आरोपी पीएसआय फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 18, 2025 4:19 PM IST


