संभाजी नगर, धाराशिवनंतर आता महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याचं नामांतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीवनंतर आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचंच नामांतर करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीवनंतर आता महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचंच नामांतर करण्यात आलं आहे. नगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानत असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.
मागच्या बऱ्याच काळापासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात यावं, अशी मागणी होत होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनंही केली गेली. या आंदोलनांनंतर राज्य सरकारने नामांतराचं आश्वासन दिलं होतं. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पारित केला आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, त्यामुळे अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 04, 2024 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजी नगर, धाराशिवनंतर आता महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याचं नामांतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय


