डोळे भरुन पोरीला भेटला... पण घरी परतलाच नाही, तीन दिवसांनी बापाचा आढळला मृतदेह
- Published by:Kranti Kanetkar
 
Last Updated:
अशोक गायकवाड मुलीला भेटून घरी जाताना बेपत्ता झाले. सोनखेड परिसरात विहिरीत मृतदेह आढळला. खुलादाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मुलगी शोकाकुल.
मुलगी आणि वडिलांचं नातंच खूप वेगळं असतं, बापाचं काळीज आणि लेकीचं मन यांचं नातं काही वेगळंच असतं. पोरीसाठी बापाच्या आणि बापासाठी लेकीच्या डोळ्यात अश्रू असतात. बाप आपल्या लेकीला भेटायला म्हणून सासरी गेला. तिथं तिला मन भरुन भेटला. पोरगी सुखात आहे, सुखानं संसार सुरू आहे हे पाहून त्याचं डोळे भरुन आले.
पोरीजवळ थोडावेळ थांबला आणि त्यानंतर घरी जायला निघाला. पण बाप घरी न पोहोचल्याने लेकीचा जीव कासावीस झाला. वाट पाहिली, दिवस सरला पण वडील काही केल्या घरी पोहोचेना, कुठे राहिले? वाट पाहिली, चौकशी केली. पोरीचा जीव आता कासावीस झाला.
मनात नको नको ते विचार येऊ लागली. तरी धीर धरुन वडील घरी येतील असा विचार ती करत राहिली. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. वडील काही घरी परतलेच नाहीत. अखेर मुलगी आणि जावई वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडले. कुठेच न सापडल्याने अखेर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार करण्यासाठी मुलगी आणि जावई पोहोचले. त्यांनी पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. 31 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
advertisement
पोलिसांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी वडिलांचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तातडीनं मुलगी आणि जावयाला देण्यात आली. मुलीला भेटून घरी निघालेले असताना विहिरीत पडून मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. अशोक गायकवाड वय 43 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी खुलादाबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी सोनखेड इथे ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले. मात्र तीन दिवस उलटूनही ते घरी परतले नाहीत.
advertisement
मुलीने आणि जावयाने वडिलांची शोधाशोध केली. अखेर पोलीस ठाणे गाठलं. सोमवारी सोनखेडा परिसरात साहेबराव वाकळे यांच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ते विहिरीत कसे पडले? कोणी त्यांना पडलं की ते त्यांनी आयुष्य संपवलं की त्यांच्यासोबत काही घडलं याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोळे भरुन पोरीला भेटला... पण घरी परतलाच नाही, तीन दिवसांनी बापाचा आढळला मृतदेह


