दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला तलावात उतरले ते परतलेच नाही, 4 मुलांचा दुदैवी मृत्यू, गावं हादरलं

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दसरा सणाच्या निमित्ताने तलावात ट्रॅक्टर धुवायला गेलेल्या चार मुलांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhaji Nagar News : अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दसरा सणाच्या निमित्ताने तलावात ट्रॅक्टर धुवायला गेलेल्या चार मुलांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या चारही मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत दोन मुलांचा आणि दोन भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव गावात ही दुदैवी घटना घडली आहे.इमरान इसाक शेख हा दसऱ्यानिमित्त आज दुपारी शेतालगत असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूम उपसल्यानंतर पडलेल्या खड्ड्याच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कुटुंबातील इमू पठाण, जोहान पठाण आणि गौरव तारक ही तीन लहान मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले उडत असल्याचे बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
advertisement
या तलावात ट्रॅक्टर धुताना पाण्याचा अंदाज आल्याने 4 मुलांचा मृत्यू झाला होता. व्यंकटेश दत्तात्रस तारक (वय 11), इरफान इसाक शेख (वय 17), इम्रान इसाक शेख (वय 12) आणि जैनखान हयात खान पठाण अशी या तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहे. या मुलांमध्ये दोन भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने पाहताच तत्काळ गावकऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला तलावात उतरले ते परतलेच नाही, 4 मुलांचा दुदैवी मृत्यू, गावं हादरलं
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement