अरे देवा! शेकोटीच्या ठिणगीनं घेतला शेतकऱ्याचा बळी, छ. संभाजीनगरची घटना
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात शेकोटीच्या ठिणगीने शेतकऱ्याचा बळी घेतला.
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील सटाणा येथील वस्तीवर रात्रीची थंडी टाळायला म्हणून एका वृद्धाने शेकोटी पेटवली होती. उब घेत बसले असताना शेकोटीतून एक ठिणगी कपड्यांवर येऊन पडली. त्यांना कळायच्या आतच कपड्यांनी पेट घेतला आणि काही क्षणात वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. रघुनाथ गायके असे 60 वर्षीय मृताचे नाव आहे.
रघुनाथ गायके हे नेहमीप्रमाणे शेतावरच्या खोपीत झोपायला गेले होते. रात्री आठ-नऊच्या दरम्यान त्यांनी शेकोटी लावली. आसपास कोणी नव्हतं, त्यामुळे ठिणगी कधी कपड्यावर पडली हे त्यांना लक्षातच आलं नाही. काही क्षणांतच आग जोरात भडकली आणि ते गंभीररित्या भाजले.
advertisement
गावकऱ्यांचा प्रयत्न, पण जीव वाचू शकला नाही..!
वस्तीवरचे शेतकरी धूर दिसताच धावत आले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी तातडीने त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासून रघुनाथ गायके यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. गावात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर पुन्हा गारठले
view commentsदरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात परत एकदा गारवा वाढला आहे. शुक्रवारी दिवसा कमाल तापमान 29.2 अंश, तर रात्री किमान 16.6 अंश नोंदवले गेले. किमान तापमान थोडं जरी जास्त असलं, तरी वार्यामुळे सकाळ-सायंकाळ चांगलीच थंडी जाणवत आहे. गेल्या आठवड्याभरात तापमान वाढलं होतं, पण आता हवेमध्ये परत गारठ्याची चाहूल लागलीय.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अरे देवा! शेकोटीच्या ठिणगीनं घेतला शेतकऱ्याचा बळी, छ. संभाजीनगरची घटना











