खरंच छत्रपती संभाजीनगर शहराला 52 दरवाजे होते का ?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
छत्रपती संभाजीनगर, 12 डिसेंबर : छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असल्याचे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शहराच्या संरक्षणासाठी 52 दरावाजे होते. असं आपण ऐकत आलो आहोत. पण खरचं शहराला 52 दरवजे होते का? तसेच 52 दरावजे होते तर त्यापैकी आता किती दरवाजे अस्तित्वात आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबद्दलच आपण छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास संशोधक संकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
52 दरवाजे नाहीतच
आपण ऐकत आलेलो आहोत की शहराला 52 दरवाजे होते. पण ऐकण्यामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये मोठी तफावत आहे. सर्व इतिहासाच्या नोंदी बघितल्या तर या दरवाजांची संख्या ही 30 च्या पुढे जात नाही. मुख्य शहर, बेगमपुरा, बाजीपुरा, नवखंड, किल्ले अर्क या पाच तटबंदीमध्ये असलेल्या सगळ्या दरवाजाची संख्या तीस आहे. तिच्या पुढे या दरवाजांची संख्या जात नाही. तसेच त्यांचे काही अवशेष देखील नाहीत. यातील सध्याला पाच दरवाजे नामशेष झालेले आहेत. यामध्ये हमखास दरवाजा, कुणी दरवाजा, खास गेट, मोती कारंजा दरवाजा आणि कुंभार दरवाजा हे पाच दरवाजे सध्याला अस्तित्वात नाहीत, असे कुलकर्णी सांगतात.
advertisement
सध्या अस्तित्वात असणारे दरवाजे
मकाई गेट, पैठण गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, भडकल गेट, रंगीन गेट, नवबत गेट, काला दरवाजा, बेगम दरवाजा , आदिलं दरवाजा, हिजरी दरवाजा, कटकट गेट, कुंभार खिडकी, अरब खिडकी, जाफर गेट, भावसिंग पुराचे दोन दरवाजे, मेहमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा, बायापुरा दरवाजा, नवाखंडा दरावजा, फाजलपुराचा दरवाजा हे 21 दरवाजे सध्याला अस्तित्वात आहेत. त्यासोबतच बेगमपुरातील चावल गेट, निपर निरंजन गेट, विद्यापीठाकडून बेगमपुराकडे जाणारे दोन तटबंदी दरवाजे, बेगमपुरा पोलीस स्टेशन समोर दोन कमानी आहेत त्यांचे अवशेष सध्याला शिल्लक आहे, असेही कुलकर्णी सांगतात.
advertisement
तर 30 दरवाजांचं शहर म्हणावं लागेल
52 पुराच शहर म्हणून 52 दरवाजांचे शहर असा समज पसरवला गेला आहे. म्हणून 52 दरवाजांचं शहर असं नाव पडलेलं आहे. पण या ठिकाणी विविध काळातील 54 पुरं आहेत. त्यामुळे 54 पुराचं आणि 30 दरवजांचं शहर आपण म्हणू शकतो. 30 पैकी 21 दरवाजे आपल्याला निश्चित पाहायला मिळतात. चार ते पाच दाराजांचे अवशेष सध्याला शिल्लक आहेत. शहराला 52 दरवाजे होते अशा नोंदी इतिहासामध्ये किंवा कुठल्याही नोंदी नकाशामध्ये नाहीत. यामुळे शहराला 52 दरवाजांचा शहर म्हणणं चुकीचंच आहे, असंही कुलकर्णींचं मत आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
December 12, 2023 9:33 AM IST