Education: शाळा सुरू होतेय, पालकांच्या फायद्याची बातमी, वह्या-पुस्तकांच्या किमतीत मोठी घट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Education: राज्यातील शाळा सुरू होत असून पालकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. अशातच पालकांसाठी फायद्याची बातमी आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होत असून, शाळा देखील सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार म्हटलं की, सर्वच पालकांची पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होतो. यंदा सर्वच वह्या-पुस्तकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री बसणार नाही. पण वह्या-पुस्तकांच्या किमतीत घट का झालीये? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील अजमेरा यांच्याकडून जाणून घेऊ.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाठ्यपुस्तक आणि वह्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट झालेली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजेच कागदाच्या किमती कमी झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या आणि वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच गाईड्सच्या किमतीत देखील घट झाली आहे. पूर्वी नवनीत कंपनीची वही 60 रुपयाला यायची ती आता 55 रुपयाला येत आहे, असे अजमेरा यांनी सांगितले.
advertisement
वह्या-पुस्तके स्वस्त
नवनीत प्रमाणे सर्वच कंपन्यांच्या वह्या स्वस्त झाल्या असून, 5 ते 7 रुपयांपर्यंत एका नगाच्या किमतीत फरक पडला आहे. वह्या-पुस्तकांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, सर्व वह्या-पुस्तके खरेदी करता येणार आहेत.
advertisement
इतर स्टेशनरीचे दर काय?
वह्या-पुस्तके वगळता इतर कुठल्याही शालेय साहित्याच्या किमतीत वाढ झालेली आहे किंवा त्याच्या किमती स्थिर आहेत. एक डझन वह्यांच्या मागे देखील 50 रुपयांचा फरक पडलेला आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. पाठ्यपुस्तकांना आणि वह्याला सध्या चांगली मागणी आहे. पण शाळा सुरू झाल्यानंतर अजून ही मागणी वाढेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
advertisement
दरम्यान, शालेय साहित्यांनी दुकाने सज्ज असून, यंदा स्वस्तात वह्या-पुस्तके मिळणार असल्याने पालकांना दिलासा मिळणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 12, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Education: शाळा सुरू होतेय, पालकांच्या फायद्याची बातमी, वह्या-पुस्तकांच्या किमतीत मोठी घट