मृत्यूच्या दारातून तिला कुणीच वाचवू शकलं नाही, ना बाप ना काळ! 20 वर्षाच्या तरुणीसोबत रात्री 2 ला काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Accident : सोमवारी मध्यरात्री त्या काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी खोलीबाहेर पडल्या होत्या. एका मित्राला चहाच्या दुकानावर थांबवून त्या तिघी ट्रिपल सीट स्कुटीवरून त्याच्याकडे जात होत्या अन् काळाने घात केला.
Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये नियतीचा क्रूर खेळ पहायला मिळाला. वर्षभरापूर्वीच वडिलांनी स्वतःच्या लिव्हरचे प्रत्यारोपण करून ज्या 20 वर्षीय लेकीला जीवदान दिले होते, त्याच लेकीचा एका भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. मैत्रिणींसह ट्रिपल सीट आणि रॉंग साईडने जाणाऱ्या स्कुटीला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात विशाखा वंजारे या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिच्या दोन मैत्रिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही हृदयद्रावक घटना सोमवारी मध्यरात्री कुंभेफळ येथे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. नुकतेच जीवनदान मिळालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याने वंजारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नियतीचा क्रूर आघात
बीड येथील रहिवासी असलेल्या विशाखा वंजारे हिचे लिव्हर गेल्या वर्षी निकामी झाले होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी स्वतःचे लिव्हर दान करून तिला जीवदान दिले होते. या प्रत्यारोपणानंतर विशाखाची प्रकृती स्थिर झाली होती आणि पुढील शिक्षणासाठी ती छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. ती सध्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. वडिलांनी जीवदान दिल्यानंतर अवघ्या वर्षभरातच विशाखाचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
advertisement
अपघात नेमका कसा झाला?
शेंद्रा येथील पीपल्स फॉरेन सिक्स सायन्स महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विशाखा वंजारे, सानवी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या तिघी कुंभेफळ परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होत्या. सोमवारी मध्यरात्री त्या काही मित्रांसोबत चहा घेण्यासाठी खोलीबाहेर पडल्या होत्या. एका मित्राला चहाच्या दुकानावर थांबवून त्या तिघी ट्रिपल सीट स्कुटीवरून त्याच्याकडे जात होत्या. याचवेळी समोरून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या स्कुटीला हुल दिली. त्याच क्षणी पाठीमागून ओव्हरटेक करत येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाला स्कुटी दिसली नाही आणि त्याने स्कुटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघीही फरफटत घासल्या गेल्या आणि एकीचा मृत्यू झाला.
advertisement
उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू
या भीषण अपघातात तिन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यांचे मित्र आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विशाखाचा मृत्यू झाला. सानवी शिंगारे आणि अपेक्षा जमधडे या दोघींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 23, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मृत्यूच्या दारातून तिला कुणीच वाचवू शकलं नाही, ना बाप ना काळ! 20 वर्षाच्या तरुणीसोबत रात्री 2 ला काय घडलं?


