Jayakwadi Dam Water: नाशिकला मुसळधार पाऊस, मराठवाड्याला दिलासा, जायकवाडी धरणाबाबत महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला, आणि त्याचा थेट परिणाम पैठणच्या जायकवाडी धरणावर झाला.

जायकवाडी धरणात पाण्याची विक्रमी आवक, 55 टक्क्यांवर पाणीसाठा पूर नियंत्रण कक्ष स्
जायकवाडी धरणात पाण्याची विक्रमी आवक, 55 टक्क्यांवर पाणीसाठा पूर नियंत्रण कक्ष स्
छत्रपती संभाजीनगर/पैठण : गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला, आणि त्याचा थेट परिणाम पैठणच्या जायकवाडी धरणावर झाला. सोमवारी (7 जुलै) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तब्बल 46 हजार 647 क्युसेक पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक धरणात झाली. सध्या धरणातला पाणीसाठा 55.37 टक्क्यांवर गेला असून, पाण्याची झपाट्याने वाढ होत चालल्याने धरण प्रशासन सतर्क झाले. याच पार्श्वभूमीवर धरणावर पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.
दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात 16 हजार 296 क्युसेकने पाण्यात वाढ होत असल्याने धरणातील पाणीसाठा 50.57 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतरच्या 24 तासांत म्हणजेच, सोमवारी संध्याकाळपर्यंत धरणात 46 हजार 647 क्युसेक पाण्याची विक्रमी आवक झाली असून, पाणी पातळी 55.37 टक्क्यांवर पोहोचली आहे.
advertisement
जायकवाडी धरणात पाण्याची विक्रमी आवक
जायकवाडी धरणातील या वाढत्या पाणी पातळीमुळे जायकवाडी पाटबंधारे विभाग पूर्णपणे अलर्ट झाला असून, कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी तातडीने पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात धरण उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, यांच्यासह अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांवर पूर नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून, परिसरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जायकवाडी धरण प्रशासन पूर्णपणे अलर्ट असून, धरणाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Jayakwadi Dam Water: नाशिकला मुसळधार पाऊस, मराठवाड्याला दिलासा, जायकवाडी धरणाबाबत महत्त्वाचं अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement