Weather Alert: मराठवाड्यात धो धो सुरूच, 24 तास धोक्याचे, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Marathwada Rain: महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असून आज 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावासाचा जोर वाढला आहे. आज पुन्हा 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पावसाने कहर केला असून आज पुन्हा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

आज 20 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच विजांसह जोरदार पाऊस होईल.
advertisement

हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज सतर्कतेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. या ठिकाणी हवामानाची हीच स्थिती कायम राहणार असून आकाश ढगाळ राहील.
advertisement

गेल्या काही दिवसांपासून मराठाड्यात पावसाने थैमान घातले आहे. बीड, परभणी, जालना, नांदेडसह सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा पावसाचा अलर्ट असल्याने नागरिकांना काळजी घ्यावी लागेल.
advertisement

पुढील काही दिवस मराठवाड्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाची तीव्रता कमी अधिक राहील.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 20, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यात धो धो सुरूच, 24 तास धोक्याचे, छ. संभाजीनगर, बीडसह 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट







