OBC Reservation : सरकार किंवा जरांगे खोटं बोलतायत, शिष्टमंडळासमोर असं का म्हणाले हाके?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय. यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसींचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईला या अशी विनंती सरकारकडून करण्यात आली.
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे आमरण उपोषण गेल्या ९ दिवसांपासून सुरू आहे. लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय. यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसींचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी मुंबईला या अशी विनंती सरकारकडून करण्यात आली. चर्चेतून आपल्या मागण्यांवर मार्ग निघेल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. पण यावेळी ओबीसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
गिरीष महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली तेव्हा बोलताना म्हटलं की, उपोषणाचा नववा दिवस असून तब्येत ढासळली आहे. आता मागण्यांबाबत चर्चा झाली आणि मला वाटतं मार्ग निघाला पाहिजे. काल फडणवीस आणि अजित दादा यांना बोललो मार्ग निघून उपोषण सुटायला हवं. सगळ्यांनी सांगितलं आहे ओबीसी समाजाला धक्का बसणार नाही. मराठा-ओबीसी यांना चर्चा केली पाहिजे. दोघांनीही चर्चा केली पाहिजे.
advertisement
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं, यावर चर्चेसाठी मुंबईला यावं अशी विनंती सरकारच्या शिष्टमंडळाने केली. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, गोपीचंद पडळकर हे वडीगोद्री इथं पोहोचले होते. त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेवेळी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी इथं चर्चेला यावं अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासमोरच गोंधळ घातला.
advertisement
सरकार किंवा जरांगे यापैकी कुणीतरी खोटं बोलत असल्याचंही लक्ष्मण हाके म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आम्ही ९ दिवसांपासून भूमिका मांडत आहे. निवेदनात आहे ते सगळं सांगू शकत नाही. सरकार म्हणतं ओबीसीला धक्का बसणार नाही. दुसरीकडे जरांगे म्हणतात आम्ही घुसलो आहोत. म्हणजे कुणी तरी खोटं बोलतंय. ग्रामीण भागातही ओबीसी लहान समूह सामाजिक मागास आहेत, त्यांचे काय होणार अशी शंका आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
OBC Reservation : सरकार किंवा जरांगे खोटं बोलतायत, शिष्टमंडळासमोर असं का म्हणाले हाके?


