एक वही एक पेन, महापरिनिर्वाण दिनी 11 वर्षांपासून राबवला जातोय अनोखा उपक्रम, गरजूंना अशी होतीये मदत
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
महापरिनिर्वाण दिनी 'एक वही एक पेन' अभियानातून वही पेन गोळा केले जातात आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवले जातात.
छत्रपती संभाजीनगर : 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी जनतेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा'चा संदेश दिला. याच संदेशातून प्रेरणा घेत छत्रपती संभाजीनगर येथील 'फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम)' तर्फे अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. महापरिनिर्वाण दिनी 'एक वही एक पेन' अभियानातून वही पेन गोळा केले जातात आणि ते गरजूंपर्यंत पोहोचवले जातात. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी सहकार्य आणि प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.
2016 पासून अविरतपणे हे अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार, फुले, मेणबत्ती, अगरबत्ती किंवा इतर नाशवंत वस्तूंनी अभिवादन करण्यापेक्षा एक वही एक पेन देऊन अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात येते. तसेच जमा झालेले वही पेन हे दुर्बल घटक आहेत ज्यांना खरंच याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना दिले जाते. चार राज्यांमध्ये आणि 22 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो.
advertisement
10 ते 11 वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. आत्तापर्यंत आम्ही जवळपास दीड लाखाच्या वरती वह्या आणि पेन संकलन केले आहे. समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ज्यांना खरोखरच गरज आहे. अशा दुर्गम भागात जाऊन आम्ही हे वही आणि पेनाचे वाटप करत असतो. फुल हारापेक्षा जर तुम्ही वही आणि पेन या ठिकाणी दिलं तर नक्कीच त्याचा समाजामध्ये उपयोग होईल, असे उपक्रमासाठी पुढाकार घेणारे शेखर निकम सांगतात.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 06, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
एक वही एक पेन, महापरिनिर्वाण दिनी 11 वर्षांपासून राबवला जातोय अनोखा उपक्रम, गरजूंना अशी होतीये मदत

