Sindoor:‘सिंदूर’ नेमकं कसं तयार होतं? छ. संभाजीनगरात आढळलं खास झाड

Last Updated:

Sindoor Tree: भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरची कामगिरी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखी मोहीम सुरू करण्यात आलीये. सिंदूर वृक्षाचे जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे.

+
Sindoor:

Sindoor: खेळणा नदीकाठी दुर्मिळ सिंदूर, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संभाजीनगरात खास मोहीम, काय करणार?

छत्रपती संभाजीनगर : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ची कामगिरी केल्याने सिंदूर हा शब्द देशभर चर्चेला आला. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केळगाव येथील खेळणा नदीकाठी दुर्मिळ सिंदूर वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. डॉ. संतोष पाटील यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धानाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
हिंदू महिला सौभाग्य प्रतीक म्हणून सिंदूर कपाळी लावतात. खरा सिंदूर हा सिंदूर किंवा कुंकुम वृक्षाच्या फळांच्या टरफल व खोडापासून निर्माण केला जायचा. राजांचे व ऋषीं- मुनी यांचे भगवे रेशमी कापड बनवण्यासाठी या झाडापासून निर्मित केशरी नैसर्गिक रंगाचा वापर होत असे. मात्र ही झाडे हळूहळू कमी होत गेली व त्या ऐवजी रासायनिक सिंदूर प्रचलनात आला.
advertisement
सिंदूरची चाळीसहून अधिक वयाची तीनच झाडे छत्रपती संभाजीनगरमधील बहुली ते चिंचपूर शिवारात खेळणा नदीकाठी आहेत. या वृक्षाच्या बिजापासून सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी काही रोपं बनवली आहेत. या रोपांचे शहीद जवान व पहलगाम येथे मृत पावलेल्या देश बांधवांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपण करण्यात आले. केळगाव येथील शहीद संदीप जाधव यांच्या स्मारकाजवळ वीरमाता विमल जाधव, डॉ. पाटील, गणेश चाथे व जाधव, सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते ही सिंदूरची रोपे लावली.
advertisement
या वृक्षाच्या फळांच्या शेंदुरी रंगाच्या टरफलावर असलेल्या तंतुना खाऊन (फायबर) मॅन फेस बग हा मानवी चेहऱ्या सारखा दिसणारा कीटक उपजीविका करतो. उन्हाळ्यात पक्व होणारी ही फळं खाण्यासाठी हा सुंदर कीटक या झाडावर अधिवास करतो. माकडेही हे बीज आवडीने खातात. अनेक जातीच्या मुंग्याही या फळाची बीज कुरतडून खातात. 'मॅन फेस बग' या कीटकास मानसासारखे दोन्ही बाजूस दोन डोळे, मध्ये नाक व ओठ, डोके असा त्याचा आकार असून कापसा सारखे तंतुमय घटक खाण्यास तो प्राधान्य देतो, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
advertisement
वृक्षारोपण भारत मातेस समर्पित
भारत मातेच्या ललाटी हे वृक्ष सौभाग्य कायमच असावे, जैवविविधता जोपासली जावी म्हणून ही दुर्मिळ होत असलेली सिंदूर वनस्पती लावली आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव 'मेलोटस फिलीपेन्सिस' असे आहे, ती झाडे आम्ही जतन केली आहेत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षांनिमित्ताने दहा ठिकाणी नव्याने रोपणही करत आहोत, असे जैवविविधता संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sindoor:‘सिंदूर’ नेमकं कसं तयार होतं? छ. संभाजीनगरात आढळलं खास झाड
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement