छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - हे शहर ऐतिहासिक असून, अजिंठा आणि वेरूळ लेण्यांसारख्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर महाराष्ट्रातील पर्यटन आणि उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

साहेबराव कोकणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातील ढवळपुरी गावात अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कलिंगड, कांदा, गहू तसेच जनावरांच्या चाऱ्यासह अनेक पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. ढवळपुरी गावात अचानक झालेल्या अवकाळी पावसासह जोरदार गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतात तयार झालेली कलिंगडाची पिके अक्षरशः फाटून गेली असून कांदा आणि गव्हाच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.






छत्रपती संभाजीनगरला (चिकलठाणा विमानतळ) मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि पुण्याहून नियमित विमानसेवा आहे. विमानतळावरून शहरात जाण्यासाठी टॅक्सी आणि बसची सोय आहे.
शहरात फिरण्यासाठी रिक्षा, सायकल-रिक्षा, शहर बस आणि कॅबचा वापर केला जातो.
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन मुंबई, पुणे, हैदराबाद, मनमाड आणि नागपूरला जोडलेले आहे. 'देवगिरी एक्सप्रेस' आणि 'अजिंठा एक्सप्रेस' सारख्या गाड्या इथे येण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पुण्याहून सुमारे 330 किलोमीटर आणि मुंबईहून सुमारे ३७० किलोमीटरवर हे शहर आहे. पुणे आणि मुंबईहून NH 52 आणि NH 160 ने इथे पोहोचता येते. 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या' (MSRTC) आणि खासगी बसेस महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून इथे नेहमी येतात-जातात.



