बाजारात आल्या ट्रेंडी राख्या, किंमत कमी पण व्हरायटी अनेक, छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्या बाजारपेठांमध्ये देवाच्या राख्या, फॅन्सी राख्या, भैय्या भाभी राखी, कीड स्पेशल राख्या, चांदीच्या राख्या आणि विविध नाव असलेल्या राख्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या या विक्रीसाठी आल्या आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीचे पवित्र नाते आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहे, त्यांच्या किमती काय आहेत, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने राखीविक्रेते अजय परदेशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील गुलमंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच या ठिकाणी अगदी स्वस्त दरामध्ये या राख्या उपलब्ध आहेत. सध्याला बाजारपेठेमध्ये अनेक अशा ट्रेंडी राख्यादेखील आलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला होलसेल आणि रिटेल या दोन्ही दऱ्यांमध्ये राख्या या मिळतील.
advertisement
सध्या बाजारपेठांमध्ये देवाच्या राख्या, फॅन्सी राख्या, भैय्या भाभी राखी, कीड स्पेशल राख्या, चांदीच्या राख्या आणि विविध नाव असलेल्या राख्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या या विक्रीसाठी आल्या आहेत.
देवांच्या नावाच्या राख्या -
यामध्ये तुम्हाला शिवजी, गणपती बाप्पा, राम मंदिराची प्रतिकृती असलेली राखी, रामाचे नाव असलेले राखी, गणपती बाप्पाची राखी, कृष्णाची राखी, ओम नाव असलेली राखी, रुद्राक्षाची राखी याठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच यांना मागणीदेखील आहे. सर्व राख्या स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.
advertisement
किड्स स्पेशल राखी -
किड्स स्पेशल राखीमध्ये छोटा भीम, स्पायडरमॅन पोकेमोन, डोरीमोन, मोटू-पतलू, टॉम अँड जेरी, बेन टेन, लाईट असणाऱ्या राख्या अशा विविध कार्टून कॅरेक्टरच्या राख्या उपलब्ध आहेत. यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राखी पौर्णिमा झाल्यानंतर या राख्या तुम्ही नंतरही खेळण्यासाठी वापरू शकता, असे ते म्हणाले.
advertisement
भैया-भाभी राखी -
सध्या बाजारामध्ये भैय्या भाभी राखी ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. सध्या भावासोबत बहिणीला देखील राखी बांधण्याचा ट्रेंड आहे. यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मिळतील.
फॅन्सी राखी -
advertisement
यामध्ये तुम्हाला स्टोनच्या, मोती असलेल्या डायमंड असलेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला चांदीच्या राख्या वेगवेगळ्या प्रकारात मिळतील. त्यांनाही मोठी मागणी असल्याचे ते म्हणाले.
किंमतीचा विचार केला तर 10 रुपयांपासून ते 400-500 रुपयांपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारच्या राख्या याठिकाणी मिळतील. तसेच होलसेल आणि रिटेल दरामध्ये सर्व राख्या मिळतील, असे ते म्हणाले.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 09, 2024 7:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बाजारात आल्या ट्रेंडी राख्या, किंमत कमी पण व्हरायटी अनेक, छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती, VIDEO

