Litchi Benefits: पोषक घटक अन् त्वचेला पावसाळ्यात फायदा, लिची खाण्याचे हे फायदे माहितीये का?

Last Updated:

लिची खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होतात. यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक हे आपल्या शरीराला मिळत असतात.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वत्रच बाजारात मोठ्या प्रमाणात लिची ही विक्रीसाठी येत असते. लिची खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होतात. यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक हे आपल्या शरीराला मिळत असतात. तर लिची खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि कोणी खावी किंवा कोणी खाऊ नये? या सर्वांविषयी आपल्याला माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी दिली आहे.
लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक हे असतात. लिचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये लिची खायला हवी. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी फायबर हे घटक असतात आणि यामधून आपल्या त्वचेला देखील याचा खूप फायदा मिळतो. तसंच आपल्या हृदयासाठी देखील लिची खाणं चांगलं असतं. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर असतात आणि हे घटक आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
तसंच हाडे मजबूत करायला देखील लिची मदत करते. यामध्ये फायबरकॅल्शियम हे घटक असतात ते फायदेशीर ठरतात. तसेच ज्यांना मधुमेह अशा रुग्णांनी लिची कमी प्रमाणात खावी कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. त्यामुळे तुम्ही लिची खाताना ती प्रमाणातच खावीअसं आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
advertisement
जर तुम्हाला दररोज लिची खायची असेल तर तुम्ही ती चांगल्या क्वालिटीची आणावी व्यवस्थित स्वच्छ धुऊन खावी कारण की त्यामध्ये अळ्या असण्याचे प्रमाण असू शकतं. तसेच खाताना ती नैसर्गिक पद्धतीनेच खावी म्हणजेच की त्याचा कुठल्याही प्रकारचा ज्यूस किंवा इतर वेगळ्या प्रकारे ते तुम्ही खाऊ नये, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
advertisement
Accept All
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Litchi Benefits: पोषक घटक अन् त्वचेला पावसाळ्यात फायदा, लिची खाण्याचे हे फायदे माहितीये का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement