मतदारयाद्यातील घोळाची होणार चौकशी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून महत्त्वाचे आदेश

Last Updated:

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मतदार याद्यांतील घोळाबाबत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

News18
News18
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मतचोरीचा आरोप केला जात आहे. मतदार याद्यांमध्ये फोलपणा पुराव्यांसह बाहेर काढला जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमधील त्रुटी दाखवून दिल्या होत्या. यानंतर हाच प्रयोग महाराष्ट्रात देखील बघायला मिळाला. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
सलग दोन दिवस मविआच्या नेत्यांनी निवडणूक यादीतील अनेक त्रुटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तसेच या यादीत बोगस मतदारांचा शिरकाव झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आरोप केलेल्या ठिकाणी चौकशी करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
advertisement
महाविकास आघाडीतील नेत्यांनी ज्या ठिकाणच्या मतदार याद्यांबाबत शंका व्यक्त केली आहे. अशा सर्व ठिकाणची जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याची प्रत आरोप करणाऱ्या नेत्यांना दिली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चाकूरमध्ये एकाच घरात २०० मतदारांची नोंद केल्याचं देखील निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. याबाबतची अधिक माहिती आता समोर आली आहे. चाकूरमध्ये एकाच घरात २०० मतदार राहत असल्याच्या आरोपांची चौकशी केली असता हे मतदार झोपडपट्टीतील असल्याचं समोर आलं आहे. या झोपडपट्टीतील घरांवर घर क्रमांक लिहिला नसल्याने सगळ्यांच्या मतदान कार्डवर एकाच घराचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदारयाद्यातील घोळाची होणार चौकशी, मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून महत्त्वाचे आदेश
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement