Balasaheb Thorat: 40 वर्षानंतर पराभव, रात्री जमिनीवर डोकं टेकवलं आणि... प्रसंग सांगताना बाळासाहेब थोरात भावूक

Last Updated:

आपल्या राजकारणाचा फाउंडेशन एकदम पक्का आहे यावेळी थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही, असेही थोरात या वेळी म्हणाले.

News18
News18
अहमदनगर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात (Sangamner Vidhan Sabha Election 2024) काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा शिंदे गटाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी धक्कादायक पराभव केला. निकालानंतर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी स्नेह संवाद मेळाव्यात संवाद साधला. या मेळाव्यातून बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच पराभवानंतर आपल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या. पराभव झाल्यानंतरची त्या रात्री काय विचार आला? यासंदर्भात सांगितले आहे. तसेच आपल्या राजकारणाचा फाउंडेशन एकदम पक्का आहे यावेळी थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही, असेही थोरात या वेळी म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात देखील चाळीस वर्षात आपण चांगलं काम केलं. कोणीही नाव ठेवणार नाही एक जण सोडून... त्यांना देखील आव्हान दिला होतं समोरासमोर या विकासावर चर्चा करा.. सत्यजीत आपल्या हाताशी आमदार आहे. त्याच्यावर जबाबदारी देऊ ती तो पार पडेल आणि तालुक्यात जयश्री देखील आहेच. इतिहासात 40 वर्षांची आपल्या कामाची नोंद सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. पराभव झाला त्या दिवशी रात्री फक्त 40 वर्ष जे उभं केलं ते कसे टिकवता येईल. कारण जे मोडायला निघाले त्यांच्या हातात सत्ता गेली. या विचारानेच पुन्हा आता मतदारसंघात उतरलोय... अजूनही मी सक्षम...
advertisement

दोष असतील ते निश्चित दूर करू, बाळासाहेब थोरांताची ग्वाही

विधानसभेचा निकाल लागला आणि आपल्याला धक्का बसला. आपल्याला मताधिक्य किती राहील याचा विचार आपण करत होतो. हे सगळं होत असताना पराभव झाला. हा धक्का बसला हे मान्य करावा लागेल. 1985 पासून एक वेगळ्या पर्वाची आपण सुरुवात केली. संगमनेर तालुक्याची वेगळी संस्कृती आपण निर्माण केली. चाळीस वर्ष आपण मला संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढवून मला विधानसभेत पाठवलं. यावेळी देखील तुम्ही काम करत होता मी राज्यात फिरत होतो. मला तुमच्या सगळ्यांवर विश्वास होता.. पण नेमकं काय घडलं हे आजही समजत नाही. प्रत्येक वेगवेगळे कारण सांगत आहे. सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. जे दोष असतील ते निश्चित दूर करू याची ग्वाही बाळासाहेब थोरांतानी दिली.
advertisement

तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव :  बाळासाहेब थोरात

गावच्या पातळीवर आता एकत्र यावे लागेल. गट तट विसरून एकत्र या तरच भविष्य आहे. आता यापुढे या चुका झाल्या त्या दुरुस्त करणारच. काहीजण कधी इकडे तर कधी तिकडे असे सुद्धा आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. मी एक स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आणि भक्कम आहे. आम्हाला त्रास झाला तर मी लढणारच... कोणताही त्रासाला आणि तुमच्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नाही.. तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे हा पराभव झाला हे लक्षात ठेवा.
advertisement

थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही: बाळासाहेब थोरात

तुमच्या भरोशावर मी राज्यात फिरलो... पण आता सगळं दुरुस्त करायच आहे... मी तिकडे चांगलं करायला जातो. तसच आपल्या राजकारणाचा फाउंडेशन एकदम पक्का आहे. यावेळी थोडासा हलल्याने ते कमकुवत होणार नाही. तुमची साथ द्या... मी आता प्रत्येक गावात जाणार आहे. गावा गावातील गट तट थांबवले पाहिजे,असेही थोरात या वेळी म्हणाले
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Balasaheb Thorat: 40 वर्षानंतर पराभव, रात्री जमिनीवर डोकं टेकवलं आणि... प्रसंग सांगताना बाळासाहेब थोरात भावूक
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement