काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर

Last Updated:

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीसोबतच काँग्रेसने 99 जागांचा टप्पा गाठला आहे.

काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर
काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीसोबतच काँग्रेसने 99 जागांचा टप्पा गाठला आहे. याआधी काँग्रेसने 87 उमेदवारांची घोषणा केली होती. आता आज जाहीर झालेल्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवार आहेत, पण यातले दोन उमेदवार हे बदली आहे, त्यामुळे काँग्रेसने आतापर्यंत 100 जणांना उमेदवारी दिली आहे. काल जाहीर झालेल्या यादीत काँग्रेसने अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत तर औरंगाबाद पूर्वमधून मधुकर देशमुख यांना उमेदवारी दिली होती, पण या दोघांऐवजी आता अंधेरीतून अशोक जाधव आणि औरंगाबादमधून लहू शेवाळे यांना तिकीट दिलं आहे.
पुणे कॅन्टॉन्मेंटमधून माजी मंत्री रमेश बागवे यांना अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना यावेळी काँग्रेस पक्ष उमेदवारी नाकारू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
दुसरीकडे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दत्ता बहिरट यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. गेल्यावेळी भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांना पराभूत केले होते. यंदा शिवाजीनगरमधून काँग्रेसचे सनी निम्हण इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला.
advertisement
काँग्रेसची यादी
महाविकास आघाडीचं जागावाटप
महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसने आतापर्यंत सर्वाधिक 99 उमेदवार घोषित केले आहेत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 83 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 77 उमेदवारांची घोषणा केली आहे, त्यामुळे महाविकासआघाडीच्या 259 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, तर अजूनही 29 जागांची घोषणा होणं बाकी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेस सेंच्युरीच्या जवळ, विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement