advertisement

8 वाजून 46 मिनिटं अन् 2 सेकंद, अजितदादांवर काळाची झडप, धडकी भरवणारा CCTV VIDEO

Last Updated:

Ajit Pawar Passes Away Latest News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.

ajit pawar
ajit pawar
Ajit Pawar Passes Away Latest News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीत येणार होते. मात्र बारामती विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवांरासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समोर येताच महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
आता अजित पवारांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. 8 वाजून 46 मिनिटं अन् 2 सेकंदाला बारामती विमानतळाजवळ एक मोठा स्फोट घडताना दिसत आहे. विमान लँडींग करताना नियंत्रण बिघडून हा अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. 8 वाजून 46 मिनिटं अन् 2 सेकंद ही वेळ बारामतीकरांसह महाराष्ट्रासाठी कायमची आठवणीत राहील अशी आहे. याच वेळी अजित पवारांवर काळाने झडप घातली.
advertisement

अजित पवारांच्या विमान अपघाताचा VIDEO

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला?

एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.
advertisement
दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
advertisement
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.
advertisement

विमान अपघातात कुणा-कुणाचा मृत्यू झाला?

खासगी VSR कंपनीचे विमान
एकूण प्रवासी 05
1. अजित पवार
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
8 वाजून 46 मिनिटं अन् 2 सेकंद, अजितदादांवर काळाची झडप, धडकी भरवणारा CCTV VIDEO
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement