advertisement

काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर

Last Updated:

काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला झालेल्या अपघाताची घटना ताजी असताना आता भंडाऱ्यात पुन्हा एका काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याचा अपघात झाला आहे.

Sangita beniwal car accident
Sangita beniwal car accident
सरवर शेख, प्रतिनिधी भंडारा: तीन दिवसांपूर्वी भंडारा गोंदियाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनासाठी ते दिल्लीला जाणार होते. त्यासाठी ते भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेनं आपल्या कारने जात होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारला भीषण अपघात झाला. ही घटना ताजी असताना आता भंडाऱ्यात पुन्हा एका काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याचा अपघात झाला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक संगीता बेनिवाल यांच्या गाडीला हा अपघात झाला आहे. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानातून तुमसरचा नियोजित दौरा आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक संगीता बेनिवाल यांच्या चारचाकी गाडीला खापा चौकात अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान घडला.रामटेकमार्गे गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी गाडीने खापा चौकात बेनिवाल यांच्या गाडीला जबर धडक दिली. अपघातात कुणीच जखमी झालं नसलं तरी बेनिवाल यांच्या एमएच ३१ एफबी ९००१ क्रमांकाच्या गाडीला उजव्या बाजूच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
ज्यावेळी अपघात झाला, तेव्हा त्यांच्या गाडीत राज्य पर्यवेक्षक कुंदा राऊत आणि काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष जयश्री बोरकर आणि त्यांचे पीए देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार बेनिवाल यांच्या ताफ्यातील स्वतंत्र गाडीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई हे देखील प्रवासात होते. ताफा भंडाऱ्याच्या दिशेनं निघाला होता, त्यातच गोंदियाला जाणाऱ्या गाडीचा अंदाज चुकल्याने अपघात झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement