Devendra Fadnavis On Parbhani Violence : परभणी हिंसाचार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा, अखेर 'तो' पोलीस अधिकारी निलंबित, चौकशीचे आदेश
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Devendra Fadnavis On Parbhani Violence : मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय ही चौकशी ही पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
नागपूर : परभणीमधील हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी हिंसाचाराची पार्श्वभूमी आणि झालेला घटनाक्रम सांगितला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय ही चौकशी ही पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, काहींच्या जमावाने अचानक टायर जाळण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांनीदेखील बंद पाळा होता. मात्र, त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या जाळण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. ही घटना कोणत्याही कटकारस्थानाचा भाग नाही. एका मनोरुग्णाने शहरातील वातावरण बिघडवले. परभणीत एका गटाने शांततेने आंदोलन केले. कोणत्याही प्रकारची हिंसाचार झाला नाही. तर, 300-400 जणांच्या जमावाने तोडफोड केली. तोडफोड करण्याच्या कृतीला समर्थन करणार का? सरकारचे नुकसान झालेच. पण, सामान्य लोकांचे एक कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. ज्यांचा काहीच संबंध नव्हता.
advertisement
त्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सायंकाळी बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून माहिती घेतली तेव्हा पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर, मी, पोलीस अधिकाऱ्यांची एकत्रित चर्चा झाली. त्यावेळीही पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन होत नसल्याचे सांगितले. सायंकाळी 6 वाजल्यानंतर कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. परभणीमध्ये अशोक घोरबांड या पोलीस अधिकाऱ्याने वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला असल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर माहिती घेतल्यानंतर अशोक घोरबांड यांची चौकशी करण्यात येणार आहे. तोपर्यंत घोरबांड यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी हिंसेवर काय म्हटले?
काही संघटनांनी परभणी बंदची हाक दिली. पोलिसांनी बंद शांततेत बंद व्हावा यासाठी शांतता बैठक बोलावली. त्यावेळी 70 च्या आसपास संघटना होत्या. त्या चर्चेत 19 ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सगळं शांततेत सुरू होते. काही संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
काहींच्या जमावाने अचानक टायर जाळण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांनीदेखील बंद पाळा होता. मात्र, त्यांच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या जाळण्यात आल्या.
advertisement
पोलिसांनी जमाव बंदी लागू करण्यात आले.
काही महिला होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला त्यांनी तोडफोड केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने समंजसपणे भूमिका घेतली. त्यानंतर बाहेरुन कुमक आली तोपर्यंत तणाव शांत झाला. 51 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. महिला आणि अल्पवयीन लोकांना अटक करण्यात आली नाही.
परभणीतील आरोपी हा मनोरुग्ण आहे.2012 पासून त्याच्यावर उपचार सुरु होते. तो खरंच मनोरुग्ण आहे का हे तपासण्यासाठी चार डॉक्टरची नेमणूक करण्यात आली.
advertisement
सकल हिंदू संघटनेच्या मोर्चानंतर परभणीची घटना घडली असल्याचे म्हटले गेले. पण, त्या मोर्चात बांगलादेशातील हिंदूंच्या मुद्यांवर भाषण झाले. भारतीय संविधानावर कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.
ही घटना कोणत्याही कटकारस्थानाचा भाग नाही. एका मनोरुग्णाने शहरातील वातावरण बिघडवले. परभणीत एका गटाने शांततेने आंदोलन केले. कोणत्याही प्रकारची हिंसाचार झाला नाही. तर, 300-400 जणांच्या जमावाने तोडफोड केली. तोडफोड करण्याच्या कृतीला समर्थन करणार का? सरकारचे नुकसान झालेच. पण, सामान्य लोकांचे एक कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. ज्यांचा काहीच संबंध नव्हता.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 20, 2024 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis On Parbhani Violence : परभणी हिंसाचार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा, अखेर 'तो' पोलीस अधिकारी निलंबित, चौकशीचे आदेश


