Dhananjay Munde: मंत्रिपद गेलं पण आलिशन जागा सुटेना,धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड; प्रकरण नेमकं काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर साडे चार महिने उलटले तरी त्यांनी अद्याप बंगला खाली केला नाही .
मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे अद्यापही सरकारी बंगल्यातच राहत असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर साडेचार महिने उलटले तरीही धनंजय मुंडेंचा मुक्काम सातपुडा बंगल्यावरच आहे. त्यामुळे बंगला वेळेत रिकामा न केल्यानं 42 लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांन 4 मार्च रोजी तब्येतीचे कारण देत अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर साडे चार महिने उलटले तरी त्यांनी अद्याप बंगला खाली केला नाही . राजीनामा दिल्यानंतर पुढील 15 दिवसांत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते.मात्र अजूनही ते तिथेच आहेत. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांनी या खात्याची जबाबदारी देण्यात आली.
advertisement
भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी करण्यात आला. मात्र अद्याप सरकारी निवास उपलब्ध न झाल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. घर खाली झाल्यावर राहायला जाईल, अशी प्रतिक्रया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
घर खाली झालं की मी राहायला जाईल : छगन भुजबळ
advertisement
छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर प्रशासनाकडून निवासस्थान कुठे आहे हे सांगण्यात आलं. मात्र तिथे कुणी राहत असेल तर आपण त्यांना बाहेर कसं काढायचं, त्यामुळे मी त्यांना एक शब्द देखील बोललो नाही, यात मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. तर अजितदादांनाही सांगितलं की घर खाली झालं की त्यानंतर मी तेथे राहायला जाईल.
advertisement
'...तर शेतकऱ्यांची खाती गोठवता', कडूंचा सरकारवर हल्लाबोल
धनंजय मुंडे बंगला सोडत नाहीत, मात्र त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाहीत. तेच दुसरीकडे शेतकऱ्यांनी कर्ज भरलं नाही तर त्यांची खाती गोठवण्यात येतात असं म्हणत बच्चू कडू यांनी धनंजय मुंडेंसह सरकारवर हल्लाबोल केलाय..
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde: मंत्रिपद गेलं पण आलिशन जागा सुटेना,धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड; प्रकरण नेमकं काय?