तुम्ही दररोज चेहऱ्यावर स्क्रब करताय? तर थांबा; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्याला स्क्रब करणे हे नेहमी चुकीचे आहे. यामुळं त्वचेला काहीही फायदा होत नाही. त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.
हिवाळा सुरू झाला की, त्वचा कोरडी होते. त्यांनंतर विविध समस्या जाणवायला लागतात. जसे की, त्वचेला खाज येणे. बारीक पुरळ येणे, त्वचा काळी पडणे अशावेळी आपण लगेच घरगुती उपाय सुरू करतो. त्यात सर्वात आधी येतं ते म्हणजे त्वचेला स्क्रब करणे. बाहेरील प्रॉडक्ट आणून किंवा घरगुती साहित्य वापरून आपण स्क्रब करतो. पण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्याला स्क्रब करणे हे नेहमी चुकीचे आहे. यामुळं त्वचेला काहीही फायदा होत नाही. त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.
ऑईली त्वचेवर स्क्रब केल्यास काय होऊ शकतं?
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात आपली त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे कोणतेही इजा करणारे प्रॉडक्ट वापरू नये. ऑईली त्वचेवर आधीच भरपूर इंपेक्शन असतात. स्क्रब केल्यानंतर ते पूर्ण चेहऱ्यावर पसरतात. त्यानंतर बारीक पचवाले पिंपल्स चेहऱ्यावर येतात. पूर्ण चेहरा पिंपल्सने भरून जातो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हे पिंपल्स लवकर जात नाहीत. त्यामुळे ऑईली स्किनवर स्क्रब करणे टाळाच.
advertisement
ड्राय स्किनवर स्क्रब केल्यास काय होऊ शकतं?
हिवाळ्यात आपली त्वचा आधीच चिडचिडी होते. सर्वाधिक त्रास असतो तो म्हणजे ड्राय स्किन असणाऱ्यांना. ड्राय स्किन असणाऱ्यांनी जर स्क्रब केले तर त्वचेतील नॅचरल ऑईल म्हणजेच ओलावा पूर्णतः निघून जातो. त्वचा आणखी कोरडी होते. त्यानंतर जर डायरेक्ट उन्हात आपला संपर्क आला तर त्वचा काळी पडते. तसेच त्वचा खाजणे, लाल पडणे, बर्निंग इफेक्ट, छोटे पिंपल्स अशी समस्या वाढते. स्क्रबमुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्वचा रफ आणि फाटल्यासारखी वाटू लागते. त्यामुळे त्वचेला स्क्रब करू नये.
advertisement
स्क्रब केले असेल तर काय करावं?
view commentsचुकीने जर स्क्रब केले असेल तर केल्यानंतर ताबडतोब मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळता येऊ शकते, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.
Location :
Maharashtra
First Published :
October 20, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्ही दररोज चेहऱ्यावर स्क्रब करताय? तर थांबा; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती