धाराशिव पोलिसांच्या DJ बंदी नियमाला खुलेआम हरताळ, अश्लील हावभाव करून तरुणांचा धिंगाणा

Last Updated:

Dharashiv Kallam News: पोलिसांकडून परवानगी न घेताच कळंब शहरात जोरजोरात डीजे वाजवत मिरवणूक काढून अश्लील हावभाव करीत तरुणांनी धिंगाणा घातला.

धाराशिव डीजेचा दणदणाट
धाराशिव डीजेचा दणदणाट
धाराशिव : धाराशिव पोलिसांच्या डीजे बंदी नियमाला खुलेआम हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील कळंब शहरात उघडकीस आला असून पोलिसांकडून परवानगी न घेताच कळंब शहरात जोरजोरात डीजे वाजवत मिरवणूक ईद ई मिलादच्या रॅलीमध्ये डीजे लावत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीजे मालकाने आणि मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांनी आवाजाची कुठलीच मर्यादा पाळली नाही.
डीजेच्या आवाजामुळे लोकांचे कान बधीर होण्याची वेळ आलेली असताना हा आवाज काही केल्या कमी होत नव्हता. उलट मोठ्या आवाजात रिमिक्स गाणी लावूनत मिरवणुकीत तरुण अश्लील हावभाव करत नाचत होते, धिंगाणा घालत होते.
यावेळी समाज माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि नागरिकांनी तक्रारी दिल्यावर पोलिसांनी जुजबी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांची कारवाई करायला सुरुवात करताच मिरवणूक काढणाऱ्या आयोजकांनी डीजे घेऊन पळ काढला. मात्र डीजे लावताना पोलिसांची परवानगी होती का? परवानगी नव्हती तर मग पोलिसांनी हे डीजे लावू कसे काय दिले? लावले असतील तर यावर कोणती कार्यवाही करणार? आपण ज्या उद्देशासाठी ह्या मिरवणुका काढतो तो उद्देश या मिरवणुकीतून सफल होतो का? असा प्रश्न कळंब शहरातील संतप्त नागरिकांनी विचारला असून आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिव पोलिसांच्या DJ बंदी नियमाला खुलेआम हरताळ, अश्लील हावभाव करून तरुणांचा धिंगाणा
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement