सव्वा लाख रुपयात सुरु केला भांडे आणि फर्निचर विक्रीची व्यवसाय, धाराशिवमधील बंधूंची वार्षिक 10 कोटींची उलाढाल

Last Updated:

घरामध्ये नेहमी वापरासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे भांडे आणि फर्निचर होय. याच व्यवसायातून धाराशिवमधील बंधूं 10 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करतात.

+
News18

News18

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : घरामध्ये नेहमी वापरासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे भांडे आणि फर्निचर होय. त्यामुळे या वस्तूंची होणारी विक्रीही मोठी असते. त्यामुळे हीच गोष्ट लक्षात घेत धाराशिव जिल्ह्यातील धनराज धुम्मा आणि शरणप्पा धुम्मा या दोघा बंधूंनी पंधरा वर्षांपूर्वी सव्वा लाख रुपयात फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता. तर आता एक एकर जागेत भांडे आणि फर्निचरचे शोरूम आहे. इतकच नाही तर व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 कोटी रुपये इतकी आहे. 
advertisement
कधी केली व्यवसायाची सुरुवात?
धुम्मा बंधूंची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुम येथील धनराज धुम्मा आणि शरणप्पा धुम्मा या दोघा बंधुंनी सुरुवातीला 2005 मध्ये फर्निचर आणि भांडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अगदी सुरुवातीला त्यांनी सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक केली. हळूहळू त्यांना मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला तसा तसा व्यवसाय देखील वाढत गेला आणि व्यवसायात भरभराटी आली. फर्निचर, भांडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फ्रीज, लहान मुलांची खेळणी, लग्नासाठीचा बस्ता, या सर्व वस्तू एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे धुम्मा बंधूंच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल कोटींवर जाऊन पोहोचली आहे.
advertisement
25 पंढरपुरी म्हशीं अन् घरीच डेअरीची सुरुवात, सोलापुरातील दूध विक्रेता महिन्याला करतोय 2 लाखांची कमाई
मुरुम येथे त्यांची शाखा आहे तर उमरगा येथे त्यांचे शोरुम आहे. आकर्षक फर्निचर भांडे लग्नासाठीचा बस्ता हे सर्व एकाच छताखाली मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते तर धुम्मा यांच्या या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 2005 ला सुरू केलेल्या व्यवसायात सुरुवातीला सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. आता वर्षाकाठी 10 कोटी रुपयांची उलाढाल होते, असे यावेळी धनराज धुम्मा यांनी सांगितले. 
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
सव्वा लाख रुपयात सुरु केला भांडे आणि फर्निचर विक्रीची व्यवसाय, धाराशिवमधील बंधूंची वार्षिक 10 कोटींची उलाढाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement