31 December: थर्टीफस्टचा बेत आखलाय? बिनधास्त 'प्यायची' आहे, इतक्या अल्प किमतीत मिळतोय परवाना

Last Updated:

31 December: नववर्षाच्या स्वागतासाठी दारू प्यायची तर परवाना घ्या, असा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आदेश आहे. धाराशिव जिल्ह्यात लाखोंच्यावर नागरिकांनी दारू पिण्यासाठी परवाने काढले आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
धाराशिव, 30 डिसेंबर : वर्ष 2023 ला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर म्हटलं की, कोणाच्याही डोळ्यासमोर पार्टी, सिलेब्रेशन आणि दारू असं चित्र उभा राहतं. 31 डिसेंबरला अनेक लोक दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करतात. यापार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू पिण्यासाठी रितसर परवाना घेण्याचे आदेश दिले आहेत.
31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू प्यायची असेल तर परवाना घ्या, असे आदेश काढले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील मध्यप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात लाखोंच्या वर लोकांनी एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात हे परवाने काढण्यात आले आहेत.
advertisement
दारू पिणाऱ्यांना फक्त दोन रुपयात एक दिवसाचा परवाना मिळणार आहे तर विक्रेत्यांना यासाठी पाच रुपये आकारण्यात येत आहेत. मध्य प्रेमींना मनसोक्त पिता यावे, यासाठी बिअर बार परमिट रूम नावे इतर ग्रुप विक्रेत्यांना दारू पिण्याचे परवाने देण्यात आले आहेत. दरम्यान दारू प्यायची असेल तर ज्या ठिकाणी परवानगी असेल किंवा परवानाधारक विक्रेत्याकडेच दारू प्यावी धाब्यावर दारू पिऊ नये धाब्यावरती दारू बोगसही असू शकते, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
advertisement
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण मद्यप्राशनाला प्राधान्य देतात. तुम्हाला जर मद्य खरेदी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला परवाना आवश्यक आहे. हा परवाना कसा मिळवायचा, याविषयीची सविस्तर माहिती खाली दिली आहे. दारूसाठी तीन ते चार प्रकारचे परवाने असतात. एका दिवसासाठीचा, आठवडाभरासाठीचा, वर्षभरासाठीचा आणि कायमचा परवाना.
advertisement
परवाना कसा मिळवाल?
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर जा.
त्यानंतर "New User? Register Here" हा पर्याय निवडा.
तिथे Create an Account हा पर्याय निवडा.
त्यानंतर लॉगिन करा आणि खालील क्रमाने पर्याय निवडा.
Home Department> Sub Department > State Excise Department
त्यानंतर Permit for purchase, possession, transport, use and Cosumption of Foreign liquor and country liquor in the state of Maharashtra या पर्यायावर क्लिक कर.
advertisement
त्यानंतर तुम्ही exciseservices.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जाल. तिथे गेल्यावर F.L X-C या पर्यायावर क्लिक करा, तुमची माहिती भरा आणि Submit करा.
त्यानंतर तुमचा फोटो, सही, आधार कार्ड अपलोड करा आणि Submit करा.
अर्जाचा क्रमांक तुम्हाला मिळाल्यानंतर शेवटच्या स्टेपला तुम्हाला पैसे भरावे लागतील नंतर परवाना मिळतो.
मराठी बातम्या/धाराशिव/
31 December: थर्टीफस्टचा बेत आखलाय? बिनधास्त 'प्यायची' आहे, इतक्या अल्प किमतीत मिळतोय परवाना
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement