कुंभमेळ्याला गेलेला धुळ्याचा तरुण घरी आलाच नाही! मला वाचवायला ये...बायकोशी फोनवर बोलला अन्
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
रात्री त्याचं बायकोशी बोलणं झालं होतं. त्याला वाटत होतं की, आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे. अखेर त्याचा फोन बंद झाला आणि सकाळी थेट त्याच्या मृत्यूची बातमीच मिळाली.
सावन पाटील, प्रतिनिधी
खंडवा : उत्तर प्रदेश राज्यात कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जगभरातील लाखो लोक सहभागी झाले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील एक तरुणही गेला होता. परंतु तो घरी परतलाच नाही. वाटेतच त्याच्यासोबत अत्यंत भयंकर घडलं. आपल्या घरापासून 200 किलोमीटरवर असताना त्याच्या आयुष्याचा प्रवास संपला. रात्री त्याचं बायकोशी बोलणं झालं होतं. त्याला वाटत होतं की, आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे. अखेर त्याचा फोन बंद झाला आणि सकाळी थेट त्याच्या मृत्यूची बातमीच मिळाली.
advertisement
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातून एक तरुण कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेला होता. परतताना अगदी घरापासून 200 किलोमीटर अंतरावर असताना त्याला मृत्यूनं कवटाळलं. जवळपास आठवडाभरापूर्वी तो आनंदानं प्रयागराजहून घरी येण्यासाठी निघाला होता. परंतु परतीच्या प्रवासात त्याच्यासोबत ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं हे पोलिसांसमोर मोठं कोडं आहे. प्रयागराजहून गंगेचा आशीर्वाद घेऊन तो घरी येत होता. परंतु आपल्याला घर कधी गाठताच येणार नाही, याची त्याला भनकही नसेल.
advertisement
मध्यप्रदेशातील जावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे रुळांजवळ शुक्रवारी एक मृतदेह आढळला. या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. जावर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची तपासणी केली. तेव्हा मृत तरुणाच्या खिशात प्रयागराज ते धुळे असं तिकीट सापडलं. इतर काही कागदपत्रांवरून या तरुणाचं नाव प्रमोद शिंदे आहे असं कळलं.
advertisement
कुंभमेळ्याहून घरी परतण्याचा आनंद होता, आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे, याबाबत कळविण्यासाठी प्रमोदने कुटुंबियांशी संपर्क साधला. परंतु इटारसी स्थानकानंतर तरुणानं ट्रेनमध्ये काही लोकांशी आपला वाद झाला असल्याचं आपल्या बायकोला फोन करून सांगितलं. त्याच्या बायकोनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद फोनवर सांगत होता की, 'काही लोकांनी मला घेरलंय, मला वाचवू शकत असशील तर इथं ये.' त्यानंतर प्रमोदचा फोन बंद झाला. कित्येकदा प्रयत्न करूनही प्रमोदचा फोन काही लागलाच नाही.
advertisement
फोन बंद झाल्यानंतर प्रमोदचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. रेल्वे रुळावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या तुटलेल्या मोबाईलमधून सिमकार्ड काढलं आणि दुसऱ्या फोनमध्ये टाकलं. पहिला फोन त्याच्या बायकोला लावला आणि दुर्घटनेबाबत माहिती दिली. नवऱ्याच्या मृत्यूबाबत कळताच त्याची बायको बेशुद्ध झाली. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रमोदचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
advertisement
Location :
Khandwa,Madhya Pradesh
First Published :
February 12, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धुळे/
कुंभमेळ्याला गेलेला धुळ्याचा तरुण घरी आलाच नाही! मला वाचवायला ये...बायकोशी फोनवर बोलला अन्