शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केली साडी, प्रकरणाला वेगळं वळण

Last Updated:

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुराचा शासकीय रुग्णालयात त्यांचे कट्टर समर्थक असलेले शरणु हांडे याची भेट घेऊन विचारपूस केली.

News18
News18
सोलापूर: गोपीचंद पडळकर यांचं कट्टर कार्यकर्ता शरणू हांडे अन् रोहित पवारांच कट्टर समर्थक अमित सुरवसे या दोघांत सुरू असलेले राजकीय वैमनस्य टोकाला गेले आहे.  अनेक दिवसांपासून असेलला राजकीय वाद गुरुवारी टोकाला गेला आणि पडळकरांचा समर्थक शरणू हंडे यास राहत्या घरासमोरून मारहाण करत अमित सुरवसे याने शरणू हांडे याचे अपहरण केले. अपहरणाच्या घटनेबाबत माहिती मिळताच सोलापूर  पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या शोधासाठी रवाना केली, त्यानंतर आरोपींना अटक करुन न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 जणांना सुनावली पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडून कोयता, हॉकी स्टिक, साडी, ब्लेड पान आदी एकूण 25 शास्त्रास्त्र आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केले. प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील अॅड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला . आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलिस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली . दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी सुनावली.
advertisement
राजकीय वैमनस्याची सुरुवात  
2021 मध्ये गोपीचंद पडळकर यांची सोलापूर शहरात पत्रकार परिषद झाली होती.पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती.त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अमित सुरवसे याने 2021 साली गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. याचा बदला म्हणून मे 2025 या महिन्यात शरणु हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण करत व्हिडीओ तयार केला होता.मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर शरणु हांडे आणि अमित सुरवसे यांनी वाद मिटवून घेतला होता.पण अमित याने याच मारहाणीचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने शरणु हांडे याचे अपहरण केले.यासाठी त्याने सुरुवातीला पुण्यातून भाड्याने कार घेतली.मित्रासह तो सोलापुरात आला आणि शरणु हांडे याला घराजवळून शास्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं.
advertisement

पडळकरांच्या कट्टर समर्थकाच झालं अपहरण

गोपीचंद पडळकर यांचे शरणू हांडे हे गुरुवारी सांयकाळी साईनगरमधील एका बियर शॉपी परिसरात थांबलेले होते.अचानकपणे चार ते पाच जण आले आणि शरणू हांडे यास मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला कारमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून नेले.आरोपींनी अपहरण केल्यानंतर हांडे यांना सुरुवातीला अक्कलकोट रोडकडे नेण्यात आले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकाकडे वळविला.दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केलीय.
advertisement

कर्नाटकातील झळकी येथून अटक 

शरणू हांडे यांचे भाऊ विष्णू हांडे यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.याप्रकरणी अमित सुरवसे याच्यासह अज्ञात चार ते पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टीम रवाना करण्यात आले होते. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणी समजला.त्यावरून कुणुकण लागताच एक पथक झळकी येथे पोहोचले.त्यानंतर तेथे चौघांना ताब्यात घेण्यात आले.
advertisement

पडळकरांकडून विचारपूस;कडक कारवाईची मागणी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापुराचा शासकीय रुग्णालयात त्यांचे कट्टर समर्थक असलेले शरणु हांडे याची भेट घेऊन विचारपूस केली. घटनेची सविस्तर माहिती घेतं या घटनेचा त्यांनी निषेध नोंदवत पोलिसांनी मारेकऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत या घटनेचा मुख्य सूत्रधार तपास करावा असं देखील म्हंटले आहे.

मांडीवर वार.. पाच टाके; हातपाय बांधून गाडीतून नेले

advertisement
या घटनेबाबत शरणू हांडे यांनी मांडीत खोल जखम झाली असून जवळपास चार ते पाच टाके पडल्याची माहिती दिली आहे. त्या बरोबर अमित सुरवसे यांनी आमदार रोहित पवारांचा जवळचा माणसाला फोन केला आणि आमदार रोहित पवार यांना या नंबर वर्ती व्हिडीओ कॉल आला आणि व्हिडीओ कॉल वर्ती मला मारहाण केलेलं दाखवले. त्यानंतर आमदार रोहित पवार म्हणले की अमित ची माफी माग मी म्हणलं कशाला माफी मागू तेवढं मी म्हंटल्यावर याला मस्ती आहे.याला काम दाखवा असे रोहित पवार म्हणल्याचे जखमी शरणु हांडे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केली साडी, प्रकरणाला वेगळं वळण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement