Jalgaon news : ट्रॅक्टरचं सीट फाडलं म्हणून कुत्र्याला फासावर लटकवलं, फरफटत नेऊन नाल्यात फेकलं, जळगावचा VIDEO व्हायरल
- Published by:sachin Salve
 
Last Updated:
हा भटका कुत्रा रोज ट्रॅक्टर खाली बसायचा. एकदा कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट फाडले या रागातून दिलीप पारधी याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे
जळगाव, 11 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे विकृत असा प्रकार समोर आला आहे. एका हैवानाने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रालीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याचा अत्यंत विकृत प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपुर गावातलीही ऑगस्ट महिन्यातील ही घटना आहे. पण, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणारा काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम मारहाण केली. नुसतं मारहाण करून तो थांबला नाही तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने लटकुन त्याला फाशी दिली. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत फरफटत नेत नाल्यात फेकून दिल्याचा भयानक प्रकार समोर आला.
advertisement
advertisement
असं का केलं?
view commentsहा भटका कुत्रा रोज ट्रॅक्टर खाली बसायचा. एकदा कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट फाडले या रागातून दिलीप पारधी याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान , हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘फाइट अगेंस्ट एनिमल क्रुएल्टीज (FAAC) या अकाऊंटने पोस्ट केला असून घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 11, 2023 7:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon news : ट्रॅक्टरचं सीट फाडलं म्हणून कुत्र्याला फासावर लटकवलं, फरफटत नेऊन नाल्यात फेकलं, जळगावचा VIDEO व्हायरल


