गोड मोसंबीची कडू कहाणी! 700 मोसंबी झाडांवर शेतकऱ्याचा जेसीबी; सरकारी मदतीपासूनही वंचित

Last Updated:

शेतकऱ्यांना दिवाळी असतानाही सरकारी मदत मिळाली नाही. जालना जिल्ह्यातील पाहेगाव येथील सुरेश चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल 700 मोसंबीच्या झाडावर जेसीबी फिरवला आहे.

+
मोसंबी

मोसंबी

आसमानी आणि सुलतानी संकट ही जणू शेतकऱ्यांसाठी पाचवीलाच पुजलेली. नुकतेच मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचेल अशी अपेक्षा होती मात्र ती देखील फोल ठरली.
अनेक शेतकऱ्यांना दिवाळी असतानाही सरकारी मदत मिळाली नाही. जालना जिल्ह्यातील पाहेगाव येथील सुरेश चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल 700 मोसंबीच्या झाडावर जेसीबी फिरवला आहे. मोसंबीला मिळत असलेला अत्यल्प दर आणि मोसंबी पिकामध्ये फळगळी चे प्रमाण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
इतर शेतकऱ्यांचे पाहून मी पाच वर्षांपूर्वी तीन एकर शेतामध्ये 15 X 15 अंतरावर 700 मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. या झाडांना मागील वर्षी तब्बल दीड लाख रुपयांचे शेणखत टाकलं. तसेच दरवर्षी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च खत औषधांवर केला. आतापर्यंत या मोसंबी बागेवर साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च झालाय.
advertisement
परंतु मागील वर्षी केवळ 30 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळालं तर यावर्षी 40 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळालं. मागील पाच वर्षांमध्ये चार लाख रुपये खर्च झाला असून केवळ 70 हजारांचे उत्पन्न हातात आलंय. उत्पन्नामधून खर्च देखील वसूल न झाल्याने झाडावर जेसीबी चालवल्याशिवाय पर्याय उरला नाही. सरकारने मदतीची घोषणा केली पण ती आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. आता दिवाळी कशी करायची असा प्रश्न आमच्या समोर आहे. अशी संतप्त भावना शेतकरी सुरेश चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोड मोसंबीची कडू कहाणी! 700 मोसंबी झाडांवर शेतकऱ्याचा जेसीबी; सरकारी मदतीपासूनही वंचित
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement