एकनाथ खडसे यांच्या घरातून चोरी, महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या त्या 'सीडी' आणि पेनड्राईव्ह गायब!

Last Updated:

चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.एकनाथ खडसेंच्या घरी सोने- चांदीचे दागिने आणि रक्कम चोरीला गेली, पण त्याचबरोबर चोरट्यांनी सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रांची देखील चोरी केल्याचा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात 27 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडले होते. यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी नंतर आणखी बारकाईने पाहिले असता त्यांच्या घरातून सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रंही गायब असल्याचे लक्षात आले. या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नक्की काय होते, याची चर्चा आता रंगली आहे.
advertisement

किती पेनड्राईव्ह गेले चोरीला?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, चोरट्यांनी दहा सीडीज चोरूल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत. एवढच नाही तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेले आहेत. ज्या शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्र आहेत ते मी पोलिसांना देखील दाखवणार असून त्या दृष्टीने तपास करण्यात बाबत पोलिसांना विनंती करणार आहे.
advertisement

एकनाथ खडसे मुंबईला त्यावेळी झाली चोरी 

एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाली तेव्हा ते मुंबईला होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते आज मुंबईहून जळगावला जिथे चोरी झाली त्या घराच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरातून सोने,चांदी यासह महत्वाची कागदपत्रं ,पेन ड्राइव्ह आणि काही महत्वाच्या सीडी ही चोरीस गेल्याच दिसून आले. आपल्या घरात कुठे काय ठेवले आहे, याची माहिती असल्याशिवाय अशी महत्वाची कागदपत्रं कोणी चोरून नेऊ शकत नाही. चोरी करण्यापूर्वी आपल्या घराच्या परिसरातील लाईट बंद होते. त्यामुळे ही चोरी रेकी करुन केली का, असा देखील सवाल उपस्थित होत आहे. पोलीस याचा सखोल तपास करावा, अशी मागणी   एकनाथ खडसे यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ खडसे यांच्या घरातून चोरी, महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या त्या 'सीडी' आणि पेनड्राईव्ह गायब!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement