Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा धसका? भाजपचा प्लान बी सुरू, शिंदेंच्या दिल्ली भेटीत काय झालं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Amit Shah : शिवसेना शिंदे गटाचे मु्ख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी अचानक दिल्लीत हजेरी लावली. बुधवारी, रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या अनपेक्षित दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. या भेटीबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मु्ख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ही भेट आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा धसका...
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. विशेषत: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा भाजप-शिंदे सेनेवर होणारा प्रभाव, तसेच त्यावर उपाययोजना यावर सविस्तर विचारविनिमय झाला.
advertisement
भाजपने युतीच्या प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी काही खासगी संस्थांकडून सर्वेक्षण करून घेतले असून, त्याचे निष्कर्ष शाह यांनी शिंदे यांना दिले. या युतीचा मुकाबला करण्यासाठी इतर कोणते पक्ष वा नेते सोबत घेता येतील, याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला असल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.
ठाकरे बंधूची युती झाल्यास काय?
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेत महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायासह, विविध राजकीय शक्यतांचा विचार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील सत्ता समीकरणे लक्षात घेता, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निवडणूक लढतीत मोठे आव्हान उभे राहू शकते, असे शिंदे यांनी शाह यांच्यासमोर मांडले.
advertisement
राज ठाकरेंच्या विरोधाचं कारण घेतलं जाणून...
दरम्यान, राज्यातील त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेल्या वादावरही चर्चा झाली. शालेय शिक्षण खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी हे धोरण रेटल्याचे सांगण्यात येते. भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपले मत बदलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावर आडकले आहेत, याची माहितीही शिंदे यांनी शाह यांना दिली.
advertisement
महायुतीत वाद टाळण्याची सूचना
राज्यातील काही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादंगांवर शाह यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत कोणताही वाद नको, अशी स्पष्ट सूचना त्यांनी शिंदे यांना दिली. भाजपच्या काही नेत्यांनी या संदर्भात थेट दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या असल्याचेही समजते. महायुतीमध्ये एकीचा संदेश जावा, यासाठी संयम आणि रणनीतीचे पालन करण्याचे निर्देश शाह यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा धसका? भाजपचा प्लान बी सुरू, शिंदेंच्या दिल्ली भेटीत काय झालं?