पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, त्यांनी खिशाला पडलेले खड्डे भरले, आदित्य ठाकरे यांची टीका, एकनाथ शिंदे म्हणाले...

Last Updated:

Aaditya Thackeray: मुंबई महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे नियंत्रण असूनही, शहरातील पायाभूत सुविधा ढासळल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे
मुंबई : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आदित्य ठाकरे यांच्या टीकेबद्दल विचारले असता मी आपत्ती काळात राजकारण करणाऱ्यांना उत्तर देणार नाही, असे ते म्हणाले.
आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून ते कशा पद्धतीने काम करतात आणि तंत्रज्ञान वापरता याची माहितीही घेतली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच अप्र्री विभागाचे संचालक सतीशकुमार खडसे यांनी त्यांना कालपासून राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
advertisement

९.५ कोटी नागरिकांना अलर्ट

तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट ९.५ कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती सोनिया सेठी यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. तर ठाणे, रायगड, मुंबई , पुण्यातील घाट विभागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एनडीआरएफ पथके तसेच इतर बचाव यंत्रणा त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन व पालिकांशी आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमार्फत सातत्याने संपर्क ठेवला जातो आणि वेळोवेळीचे अलर्ट त्यांना दिले जातात त्यामुळे कुठेही बचाव कार्य किंवा मदत पोहचवायची असेल तर लगेच ते करता येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
advertisement

तज्ज्ञ कर्मचाऱ्यांशी चर्चा

यावेळी उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील तज्ञ, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष व्यवस्था कशी काम करते ते जाणून घेतले आणि समाधान व्यक्त केले. हे कर्मचारी २४ तास काम करतात, त्यांची राहण्याच्या व्यवस्था आणि इतर अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.

ठाण्याच्या धर्तीवर पथके

ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रधान सचिव नगरविकास डॉ गोविंदराज यांना दिले. कोकण आपत्ती सौम्यीकरणाची किती कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना त्याचप्रमाणे आपत्ती कार्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
advertisement

आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले...

मुंबई महापालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे नियंत्रण असूनही, शहरातील पायाभूत सुविधा ढासळल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजप सरकारच्या कमालीच्या बेफिकीरीमुळे आज मुंबई थांबली. ज्याठिकाणी पूर्वी कधीच पाणी साचत नव्हतं, अशा भागांत आज पाणी साचलं. एकनाथ शिंदे यांनी खिशाला पडलेले खड्डे भरले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, त्यांनी खिशाला पडलेले खड्डे भरले, आदित्य ठाकरे यांची टीका, एकनाथ शिंदे म्हणाले...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement