Ladki Bahin योजनेवरुन CM विरोधकांवर संतापले, "खोडा घालाल तर कोल्हापुरी जोडा दाखवू"
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापूरी जोडा दाखवल्याशिवाय थांबू नका, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरीकांना केले आहे. साताऱ्याच्या कोरेगावमधील एका सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
सचिन जाधव, सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी शिंदे सरकारला घेरायला सुरूवात केली आहे. पण लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्यांना कोल्हापूरी जोडा दाखवल्याशिवाय थांबू नका, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरीकांना केले आहे. साताऱ्याच्या कोरेगावमधील एका सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
साताऱ्यात कोरेगावचे महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचाराच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलते होते. यावेळी त्यांनी लाडकी बहिणसह अनेक मुद्द्यावरून विऱोधकांवर हल्ला चढवला होता. कोविडच्या काळात लपुन कसं चालायचंय. पण मी जे जे करायचं ते मी त्या काळात बाहेर पडून केलं, असा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंनी टोला लगावला.
शिंदेंचे ठाकरेंना आव्हान
advertisement
शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर ठाकरेंनी जनतेच्या दरबारात जाण्याची भाषा केली होती. हाच धागा पकडून आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.दोन अडिच वर्षांच महाविकास आघाडीचं कामं आणि दोन वर्षांच महायुतीचं काम, जावा जनतेच्या दरबारात आणि होऊन जाऊद्यात दुध का दुध आणि पाणी का पाणी, असे आव्हान शिंदेंनी ठाकरेंना दिले आहे.
advertisement
मुख्यमंत्री शिंदेंनी लाडकी बहिणवरून देखील विरोधकांना घेरलं आहे. लाडक्या बहिणींच प्रेम मिळतय,त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय. पण हे सरकार म्हणजे देना बँक लेना बँक नाही, असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे.तसेच कोणी मायकलाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद करु शकणार नाही. तरी जर योजनेत खोडा घातला, तर कोल्हापूरी जोडा दाखवल्या शिवाय थांबु नका, असे आवाहन शिंदेंनी जनतेला केले आहे.
advertisement
त्याचसोबत २३ नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात टाकणार आहे.आणि लाडक्या बहिणींना १५०० रूपयांवर न ठेवता त्यांचा निधी वाढवणार आहे. मला बहिणी लखपती झालेल्या बघायच्या आहेत, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
कोविडमध्ये लपुन कसं चालेल
जे जे करायचं त्या काळात मी बाहेर पडुन केलं
advertisement
लोकांसाठी बाहेर पडलो
आपल्या आशर्वादानं माझं चांगलं सुरु आहे
जनता हेच माझं टॉनिक आहे
महेश शिंदे सारखा आमदार असावा
जनतेच्या दरबारात जावा दोन अडिच वर्षांच महाविकास आघाडीचं कामं आणि दोन वर्षांच महायुतीचं काम होवुन जावुद्यात दुध का दुध पाणी का पाणी
लाडक्या बहिणींच प्रेम मिळतय
लाडक्या बहिन योजनेत विरोधकांच पोट दुखायला लागलं
advertisement
हे सरकार म्हणजे देना बँक लेना बँक नाही
कोणी मायकलाल आलातरी लाडकी बहीण योजना बंद करु शकणार नाही
योजनेत खोडा घालणा-यांना कोल्हापुरी जोडा दाखवल्या शिवाय थांबु नका
२३ नोव्हेंबरला निकाल झाला की डिसेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात टाकणार
लाडक्या बहिणींना १५०० वर न ठेवता पैसे वाढवणार असुन बहिणी लखपती झालेलं बघायचय
advertisement
शेतकरी आमचा अन्नदाता मायबाप
सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळिराजाचा
माझ्या बहिणींकडं वाकड्या नजरेनं पाहिलं त्याला फाशीची शिक्षा होईल
बदलापुरच्या घडनेत आरोपीला फाशी द्या म्हणारे विरोधकांनी पोलीसांनी आरोपिचा एनकाऊंटर केला तेव्हा यांनीच पुन्हा टिका केली
आम्ही संघर्षातुन आलोय
लाडक्या बहिणींसाठी आम्हाला जेल मध्ये जावं लागलं तरी १०० वेळा तुरुंगात जावु
मुंगेरीलाल के हसीण सपने हे विरोधकांचे आहेत
महेश शिंदे यांच काम अतुलणीय
माझा सर्वात आवडता आमदार हा महेश शिंदे आहे
Location :
Satara,Maharashtra
First Published :
November 05, 2024 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ladki Bahin योजनेवरुन CM विरोधकांवर संतापले, "खोडा घालाल तर कोल्हापुरी जोडा दाखवू"